बोराडीला कडकडीत बंद; विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा- दोंडाईचा : व्यावसायिकांना १४ एप्रिलपावेतो कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:34 AM2021-04-12T04:34:03+5:302021-04-12T04:34:03+5:30

बोराडीत प्रतिसाद बोराडी- शासनाच्या आदेशानुसार बोराडी गावातील सर्व व्यावसायिकांनी शनिवार व रविवार दुकाने बंद ठेवली. तसेच नागरिकांनीही घराबाहेर पडणे ...

Boradi tightly closed; Dondaicha: Professionals urged to test Paveto Corona on April 14 | बोराडीला कडकडीत बंद; विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा- दोंडाईचा : व्यावसायिकांना १४ एप्रिलपावेतो कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन

बोराडीला कडकडीत बंद; विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा- दोंडाईचा : व्यावसायिकांना १४ एप्रिलपावेतो कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन

Next

बोराडीत प्रतिसाद

बोराडी- शासनाच्या आदेशानुसार बोराडी गावातील सर्व व्यावसायिकांनी शनिवार व रविवार दुकाने बंद ठेवली. तसेच नागरिकांनीही घराबाहेर पडणे टाळले. एस. टी., रिक्षा तसेच खासगी वाहनेही बंद असल्याने बसस्थानक परिसरात वर्दळ थांबल्याचे चित्र होते.

गावात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्यामुळे शनिवार, रविवारी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेऊन निर्बंध पाळण्यात आले. तापमानाचा पाराही वाढल्याने दुपारी रस्ते निर्मनुष्य होत असल्याने संपूर्ण गावात शांतता दिसून आली.

बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू असून संशयित रुग्णाची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. नागरिकांनी विनामास्क, विनाकारण फिरू नये, असे आवाहन उपसरपंच राहुल रंधे यांनी केले आहे.

विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करावी

दोंडाईचा- शहरात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे संशयित रुग्ण शोधणे व कोरोनाची साखळी खंडित होणे गरजेचे आहे. विविध दुकानदार व ग्राहक संपर्कात येतात. दुकानदार कोरोनावाहक असेल तर कोरोना संसर्ग वाढून ग्राहकही कोरोनाबाधित होऊन रुग्णसंख्या वाढू शकते. यामुळे ‘ब्रेक द चेन’ मिशनअंतर्गत दोंडाईचा शहरातील सर्व लहान-मोठे विक्रेते-दुकानदार यांनी १४ एप्रिलपावेतो कोरोना चाचणी करून घ्यावी, असे सूचनावजा आवाहन अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी केले आहे.

दोंडाईचा शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जनता कर्फ्यू व टाळेबंदीतही अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. यामुळे या क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, औषधविक्रेते यांच्यासह भाजीपाला, फळेविक्रेते, उघड्यावर खाद्यपदार्थ विकणारे, सर्व किरकोळ व ठोक दुकानदार, व्यावसायिक आदींनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘मिशन ब्रेक द चेन’ अंतर्गत चाचणी करणे बंधनकारक आहे.

१४ एप्रिलपावेतो चाचणी करून तसा अहवाल सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असेल तर दुकानावर येऊ नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा अपर तहसीलदार सुदाम महाजन, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी दिला आहे.

Web Title: Boradi tightly closed; Dondaicha: Professionals urged to test Paveto Corona on April 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.