हाडाखेड तपासणी नाक्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:56 PM2020-03-23T12:56:03+5:302020-03-23T12:56:30+5:30

ट्रक चालकांची तपासणी

Bone check on the nose | हाडाखेड तपासणी नाक्यावर

dhule

Next


शिरपूर : कोरोना विषाणूंचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर ये-जा करणाऱ्या वाहन चालकांची आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे़
कोरोना विषाणूंचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ये-जा करणाºया सर्व वाहन चालकांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ त्याअनुषंगाने येथील आरोग्य विभागातील अधिकारी, उपजिल्हा रूग्णालयाचे पथक महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्यावर २४ तास यासाठी तैनात करण्यात आले आहे़ संबंधित चालकांची कसून चौकशी करून तपासणी केली जात आहे़ ज्या वाहन चालकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांना येथील उपजिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. कोरोना संसर्गजन्य आजाराचा देशभरात प्रादुर्भाव झाल्याने सर्व आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.
४ कोरोना व्हायरसपासुन होणाºया प्रादुभार्वामुळे आज संपूर्ण शिरपूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
४या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पंचक्रोशीचा रविवारी भरणारा आठवडा बाजार व बाजारपेठ १००टक्के बंद ठेवण्यात आली.
४ देशावर आलेली कोरोनाची आपत्ती निवारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या रविवार २२ मार्चच्या जनता कफ्यूर्ला सर्व ठिकाणी प्रतिसाद मिळाला.
४परिसरातील व्यावसायिकांनी खबरदारी म्हणून जनता कर्फ्यूला १००% पाठिंबा देऊन आपले व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवले.

Web Title: Bone check on the nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे