शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

धुळ्यात दोन गटातील वादात तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:41 IST

आरोपींना पकडण्यासाठी पथक : डॉ़ आंबेडकर पुतळ्याजवळ रास्तारोको

ठळक मुद्देदेवपुरातील नरसिंह बियरबार जवळ दोन गटात हाणामारीगंभीर जखमी तरुणाचा उपचादरम्यान मृत्यू आरोपींना पकडण्याची मागणी कायम, रास्तारोको आंदोलन, पोलिसांचा बंदोबस्त 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : देवपुरातील जयहिंद महाविद्यालय चौकातील नरसिंह बिअरबार परिसरात बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन गटात झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले़ यावेळी धारदार शस्त्राने वार झाल्याने चौघांना गंभीर दुखापत झाली़ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथेही पुन्हा हाणामारीचे पडसाद उमटले़ उपचार घेताना सनी उर्फ प्रशांत प्रकाश साळवे (१६) या तरुणाचा मृत्यू झाला़ आरोपींना पकडण्याची मागणी करत घटनेनंतर गुरुवारी सकाळी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ दोन दिवसांपुर्वी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन झालेल्या वादाचे पडसाद बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जयहिंद महाविद्यालय चौकातील नरसिंह बिअरबार परिसरात उमटले़ दोन तरुणाचा गट आपापसात भिडल्याने हाणामारीत त्याचे पडसाद उमटले़ यावेळी सर्रासपणे चॉपर, गुप्ती, तलवार, लोखंडी पाईप, रॉड अशा धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला़ यात सागर राजेंद्र साळवे (२१), सनी उर्फ प्रशांत प्रकाश साळवे, सुमीत अनिल सुर्यवंशी, सौरभ वसंत साळवे (रा़ चंदननगर, देवपूर धुळे) यांना गंभीर दुखापत झाली़ त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले़ या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात धुडगूस घालण्यात आल्याचे सांगण्यात आले़ पोलिसात फिर्याद दाखलघटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले़ याप्रकरणी सागर राजेंद्र साळवे (रा़ चंदननगर, देवपूर) या तरुणाने फिर्याद दिली़ त्यानुसार, संशयित दादा भोई, गुड्ड्या फुलपगारे, जितू फुलपगारे, गणेश फुलपगारे, दीपक फुलपगारे, वैभव गवळे यांच्यासह १५ ते २० जणांनी धारदार शस्त्राने वार केला़ त्यांच्याविरुध्द गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२४, २९५, ४२७, ३२३, ५०४, ५०६ यासह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला़ उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे घटनेचा तपास करीत आहेत़ रास्तारोको आंदोलनगंभीर जखमी झालेल्या तरुणाचे निधन झाल्यानंतर वातावरण अधिकच तणावपुर्ण झाले़ आरोपींना तातडीने अटक करा, तरुणाचे इनकॅमेरा शवविच्छेदन झाले पाहीजे अशा प्रमुख दोन मागण्या घेऊन शेकडो तरुण रस्त्यावर उतरले़ डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आणि परिसरात रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले़ पदाधिकारीही दाखलघटनेची माहिती मिळताच डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वाल्मिक दामोदर, एम़ जी़ धिवरे, एस़ यू़ तायडे, किरण जोंधळे, अ‍ॅड़ राहुल वाघ, अ‍ॅड़ विशाल साळवे, अ‍ॅड़ उमाकांत घोडराज यांच्यासह अन्य पदाधिकारी दाखल झाले आहेत़ मार्गावरील वाहतूक ठप्पडॉ़ बाबासाहेब आंबडेकर पुतळ्याजवळील चौकात रास्तारोको केल्यामुळे या भागातील तिनही रस्ते वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती़ काही वेळ राज्य परिवहन महामंडळाच्या बस देखील अडविण्यात आल्या होत्या़ आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिल्यामुळे बस पुर्ववत मार्गस्थ करण्यात आल्या़ दुकाने झाली बंदघटनेचे तीव्र पडसाद उमटत असल्यामुळे तातडीने बसस्थानक परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती़ त्यामुळे या भागात शुकशुकाट पसरला होता़ दुपारी उशिरापर्यंत तणाव मात्र कायम होता़ पाच पथक रवानाघटनेनंतर उमटत असलेले पडसाद लक्षात घेता तातडीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली़ आरोपींच्या शोधासाठी पाच पथके पाठविण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी दिली़ पोलिसांचा बंदोबस्तपोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र सोनवणे, सचिन हिरे आणि विविध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी ठाण मांडून आहे़ तणावपुर्ण शांतता कायम आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा