लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गेल्या दहा वर्षांपासून मनपा बरखास्त करा अशी मागणी आमदार करीत असतात़ यापूर्वी तर आमदारांनी १० आॅक्टोबर ही बरखास्तीची तारीख जाहीर करून आगाऊ फटाकेही फोडले होते, अशी टिका शिवसेनेचे नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी आमदार अनिल गोटेंवर केली आहे़आमदार अनिल गोटे यांनी मनपाच्या ४४ नगरसेवकांना अपात्र करण्यासह बेकायदेशिर ठराव केल्याने मनपा बरखास्त करण्याची मागणी नगरविकास विभागाच्या सचिवांकडे केली आहे़ आमदारांच्या या मागणीवर परदेशी यांनी टिका केली आहे़ केंद्र व राज्यात सत्ता असल्याने आमदार कायद्याचे सर्रास उल्लंघन करतात़ नगरसेवकांवर गलिच्छ आरोप करतात़ पाणी योजनेतील भ्रष्टाचार का दडपून ठेवला, असा प्रश्नही परदेशी यांनी उपस्थित केला आहे़ मनोज मोरेंची आमदारांवर टिकाआमदारांनी मनपा निवडणूक जिंकण्याची स्वप्ने पाहण्यापूर्वी यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले हे सांगावे़ भयमुक्त, गुंडगिरी मुक्त धुळे शहर, अवैध व्यवसाय मुक्त धुळे शहर, ३१ डिसेंबर २०१२ रोजी मनमाड-इंदूर रेल्वे धावणार, पतसंस्था लुबाडलेल्या २३ हजार १६५ ठेवीदारांच्या ठेवी कोल्हापूरच्या कथित बँकेकडून मदत घेवून ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचे पैसे मिळवून देणार होतात, त्याचे काय झाले? मनपाची सत्ता तर सोडाच विधानसभा निवडणूकीतही आमदारांना पराभव पत्करावा लागेल, असे पत्रक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी काढले आहे़
धुळे मनपा बरखास्तीबाबत आमदारांची व्यर्थ बडबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 11:34 IST
नगरसेवक नरेंद्र परदेशी, मनोज मोरेंची आमदारांवर टिका
धुळे मनपा बरखास्तीबाबत आमदारांची व्यर्थ बडबड
ठळक मुद्दे-आमदारांकडून कायद्याचे सर्रास उल्लंघन-नगरसेवकांच्या तापामुळेच मनपा बरखास्तीची मागणी-मनपा सोडाच विधानसभा निवडणूकीतही पराभव अटळ