शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वर्षभरात तिकिटांचा काळाबाजार; ५७ दलालांवर कारवाई

By सचिन देव | Updated: April 5, 2023 21:08 IST

बेपत्ता व घरातून पळालेल्या २०३ बालकांनाही पुन्हा केले पालकांच्या स्वाधीन

धुळे : मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरोधात जोरदार कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरात भुसावळ विभागातील विविध स्टेशनवरून तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ५७ दलालांना अटक करून कडक कारवाई केली आहे. तसेच रेल्वेने घरातून पळालेल्या व बेपत्ता झालेल्या २०३ मुलांना ताब्यात घेऊन, त्याच्या पालकांच्या स्वाधीनही केले आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाची महत्त्वाची भूमिका असून, भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक सुपरफास्ट गाड्यांना शस्त्रधारी रेल्वे सुरक्षा बलाची सुरक्षा पुरविण्यात येत आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बहुतांश स्टेशनवर सीसीटीव्हीची यंत्रणा बसविण्यात आली असून, यामुळे गैरप्रकाराच्या घटना तत्काळ उघडकीस येण्यास मदत होत आहे. त्यानुसार भुसावळ भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाने गेल्या वर्षभरात विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत. गेल्या वर्षी धावत्या गाडीची साखळी ओढल्याप्रकरणी ८४७ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली.

गाडीत विनापरवानी खाद्यपदार्थ विक्री करण्यास मनाई आहे. तरीदेखील विनापरवानगी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ८ हजार ७०३ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. रेल्वेगाडीतही महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडत असून, अशा प्रकारे छेडछाड करणाऱ्या ‘मेरी सहेली ऑपरेशन’अंतर्गत ८३ प्रवाशांवर कारवाई केली. तसेच रेल्वेची सिग्नल यंत्रणेची केबल चोरीप्रकरणी वर्षभरात ५२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही सर्व कारवाईची प्रक्रियाडीआरएम एस. एस. केडिया, सीनिअर डीसीएम डॉ. शिवराज मानसपुरे व रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त श्रीनिवास राव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याचे रेल्वे सुरक्षा बलातर्फे सांगण्यात आले.

...अन् १४ प्रवाशांचे वाचविले प्राण

अनेक प्रवासी धावती रेल्वेगाडी पकडणे किंवा धावत्या रेल्वेगाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न करतात. यामुळे संबंधित प्रवाशाचा जीव धोक्यात येत असून, रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी अशा प्रकारे स्वत:च्या जिवाची बाजी लावून गेल्या वर्षी १४ प्रवाशांचे प्राण वाचविले. तसेच गाडीत चोरीला गेलेल्या १३३ प्रवाशांच्या सामानाचा शोध घेऊन, ते प्रवाशांना सुखरूप परत देण्यात आले.

टॅग्स :DhuleधुळेIndian Railwayभारतीय रेल्वे