शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
4
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
5
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
6
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
8
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
9
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
10
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
11
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
12
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
13
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
14
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
15
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
16
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
17
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
18
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
19
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
20
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!

धुळे,शिरपूर शिंदखेड्यात भाजप तर साक्रीत आघाडीचे सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 6:13 PM

पंचायत समिती : धुळे, शिरपूरमध्ये भाजपला प्रथमच मिळाली सत्ता

धुळे :जिल्ह्यातील चार पंचायत समिती सभापती-उपसभापतींची निवड गुरूवारी झाली. धुळे, शिरपूर, शिंदखेड्यात भाजपचे तर साक्रीत महाविकास आघाडीचे सभापती, उपसभापती झाले. विशेष म्हणजे धुळे व शिरपूर पंचायत समितीत भाजपला प्रथमच सत्ता मिळालेली आहे.पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीसाठी आज प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितींमध्ये तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली.धुळ्यात सभापतीपदासाठी भाजपतर्फे विजय भगवान पाटील व शिवसेनेतर्फे देवेंद्र गोकूळ माळी यांनी तर उपसभापतीपदासाठी अनुक्रमे भाजपचे विद्याधर अभिमन पाटील व कांग्रेसचे लक्ष्मण पीतांबर पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. दुपारी तीन वाजता सभा सुरू झाल्यावर देवेंद्र माळी व लक्ष्मण पाटील यांनी अनुक्रमे सभापती, उपसभापतीपदाचे अर्ज मागे घेतल्याने, सभापतीपदी भाजपचे विजय भगवान पाटील व उपसभापतीपदी विद्याधर पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले.शिरपूरमध्ये सभापतीपदी भाजपचे सत्तारसिंग नावखा पावरा यांची तर उपसभापतीपदी भाजपच्या धनश्री योगेश बोरसे यांची बिनविरोध निवड झाली.शिंदखेड्यात सभापती, उपसभापतीपदासाठी मतदान घेण्यात आले. सभापतीपदासाठी भाजपच्या वैशाली अरूण सोनवणे यांना १४ तर शिवसेनेच्या मालुबाई भाईदास पाटील यांना सहा मते मिळाली. उपसभापतीपदासाठी भाजपच्या नारायणसिंग दिवाणसिंंग गिरासे यांना १४ तर राष्ट्रवादीचे भगवान भिका भिल यांना सहा मते मिळाली. सभापतीपदी वैशाली सोनवणे (चिलाणे) तर उपसभापतीपदी नारायणसिंग गिरासे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.साक्री पंचायत समिती सभापती, उपसभापतींची मतदान प्रक्रियेने निवड करण्यात आली. यात सभापतीपदी महाविकास आघाडीच्या प्रतिभा पंकज सूर्यवंशी तर उपसभापतीपदी अ‍ॅड. नरेंद्र उत्तमराव मराठे यांची निवड झाली.

टॅग्स :Dhuleधुळे