धुळे,शिरपूर शिंदखेड्यात भाजप तर साक्रीत आघाडीचे सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:13 PM2020-01-16T18:13:04+5:302020-01-16T18:13:25+5:30

पंचायत समिती : धुळे, शिरपूरमध्ये भाजपला प्रथमच मिळाली सत्ता

BJP in Dhule, Shirpur Shindkheda and Sakrit alliance president | धुळे,शिरपूर शिंदखेड्यात भाजप तर साक्रीत आघाडीचे सभापती

धुळे,शिरपूर शिंदखेड्यात भाजप तर साक्रीत आघाडीचे सभापती

Next

धुळे :जिल्ह्यातील चार पंचायत समिती सभापती-उपसभापतींची निवड गुरूवारी झाली. धुळे, शिरपूर, शिंदखेड्यात भाजपचे तर साक्रीत महाविकास आघाडीचे सभापती, उपसभापती झाले. विशेष म्हणजे धुळे व शिरपूर पंचायत समितीत भाजपला प्रथमच सत्ता मिळालेली आहे.
पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीसाठी आज प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितींमध्ये तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली.
धुळ्यात सभापतीपदासाठी भाजपतर्फे विजय भगवान पाटील व शिवसेनेतर्फे देवेंद्र गोकूळ माळी यांनी तर उपसभापतीपदासाठी अनुक्रमे भाजपचे विद्याधर अभिमन पाटील व कांग्रेसचे लक्ष्मण पीतांबर पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. दुपारी तीन वाजता सभा सुरू झाल्यावर देवेंद्र माळी व लक्ष्मण पाटील यांनी अनुक्रमे सभापती, उपसभापतीपदाचे अर्ज मागे घेतल्याने, सभापतीपदी भाजपचे विजय भगवान पाटील व उपसभापतीपदी विद्याधर पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
शिरपूरमध्ये सभापतीपदी भाजपचे सत्तारसिंग नावखा पावरा यांची तर उपसभापतीपदी भाजपच्या धनश्री योगेश बोरसे यांची बिनविरोध निवड झाली.
शिंदखेड्यात सभापती, उपसभापतीपदासाठी मतदान घेण्यात आले. सभापतीपदासाठी भाजपच्या वैशाली अरूण सोनवणे यांना १४ तर शिवसेनेच्या मालुबाई भाईदास पाटील यांना सहा मते मिळाली. उपसभापतीपदासाठी भाजपच्या नारायणसिंग दिवाणसिंंग गिरासे यांना १४ तर राष्ट्रवादीचे भगवान भिका भिल यांना सहा मते मिळाली. सभापतीपदी वैशाली सोनवणे (चिलाणे) तर उपसभापतीपदी नारायणसिंग गिरासे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
साक्री पंचायत समिती सभापती, उपसभापतींची मतदान प्रक्रियेने निवड करण्यात आली. यात सभापतीपदी महाविकास आघाडीच्या प्रतिभा पंकज सूर्यवंशी तर उपसभापतीपदी अ‍ॅड. नरेंद्र उत्तमराव मराठे यांची निवड झाली.

Web Title: BJP in Dhule, Shirpur Shindkheda and Sakrit alliance president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे