लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे :येथे अद्यायावत असे ग्रामपंचायत कार्यालय साकारणार असून, त्याचे नुकतेच गटनेते भगवान पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन झाले.कापडणे येथील ग्रामपंचायत कार्यालय ६० वर्षे जुने आहे. गाव दरवाजा व त्यातील ग्रामपंचायत कार्यालय दिमाखात उभे आहे. मात्र जुन्या दरवाज्यावरील असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात जातांना व उतरतांना ज्येष्ठ नागरिकांना कसरत करावी लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीने तळ मजल्यावर कार्यालय करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. अखेर १४ व्या वित्त आयोगातून निधी प्राप्त झाल्याने जुन्या दरवाज्याच्या बाजूला या निधीतून सुसज्ज असे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात येणार आहे. १४ व्या वित्त आयोगातून या कामासाठी पंधरा लाख रुपये निधी मंजूर झाला. भूमिपूजनाप्रसंगी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवल पाटील, सरपंच जया पाटील, ग्रामविकास अधिकारी किशोर शिंदे, प्रमोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र माळी, पितांबर पाटील, अमोल पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, महेंद्र पाटील, अरविंद पाटील, छोटू माळी, बापू माळी, चुडामन पाटील, संतोष पारधी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 15:03 IST