गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर, नर्स, अधिकारी, कर्मचारी लढताहेत. ज्या वेळी कोणी घराच्या बाहेर निघत नव्हते तेव्हा हे सर्व महाराष्ट्राच्या हितासाठी जनतेच्या रक्षणासाठी पुढे होते. त्यांच्याच हस्ते आज भगवा चौक गणेश मंडळाचे भूमिपूजन संपन्न झाले. भगवा चौक गणेश मंडळाचे यंदा १९ वे वर्ष असून दरवर्षी समाजोपयोगी जनजागृतीपर सादरीकरण होत असे. सामाजिक बांधिलकी जपून गरजूंना मदतीसाठी तत्पर असणारे भगवा चौक गणेश मंडळ आहे. यंदा सादरीकरण न करता शांततेत गणेश उत्सव साजरा करणार आहोत.
भगवा चौक गणेश मंडळ भूमिपूजनप्रसंगी उपस्थित ॲड. पंकज गोरे, भगवा चौक गणेश मंडळ अध्यक्ष प्रवीण मुर्तडक, सल्लागार रामभाऊ कानकाटे, उपाध्यक्ष मयूर कुळकर्णी, गोविंद पाखले, मंगेश पिंगळे, संजय खिवसरा, बडगुजर, बिल्लू शर्मा, सागर गोरे, चिराग खिलोसिया, राम परदेशी, पंकज बागूल, चंदू चव्हाण, दर्शन कंबायत, आशिष गोरे, राजेंद्र पाठक, यासह भगवा चौक गणेश मंडळ सदस्य व भागातील नागरिक उपस्थित होते.