शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

कोरोनाच्या लढाईत एन.सी.सी. कॅडेट मदतीला धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 22:13 IST

छात्र सैनिकांना आॅनलाईन प्रशिक्षण : विविध गावांमध्ये जनजागृती; नियम पालनाची करित आहेत सक्ती

धुळे : कोरोना या आजाराला हरविण्यासाठी डॉक्टर, पोलीस सर्व जीवावर उदार होऊन लढत आहेत. या लढाईत आपणही खारीचा वाटा उचलावा म्हणून एन.सी.सी. कॅडेटस् मदतीला धावले आहेत. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत आणि कंमांडींग आॅफिसर कर्नल राजिंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखालील विविध संस्थांमधील छात्रसैनिकांची नियुक्ती केली आहे.४८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.चे कंमांडीग आॅफीसर कर्नल राजिंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या छात्र सैनिकांनी दीक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून कोरोना पासून बचाव करण्यासाठी आॅनलाईन प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत व कर्नल राजिंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली छात्र सैनिकांची गावांमध्ये नियुक्ती केली आहे.तिसगाव ढंडाणेतिसगाव - धुळे येथील व्ही.एस.डब्ल्यू. कॉलेज व एस. एस.व्ही.पी एस. सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेले लेफ्टनंट प्रा.सुनील पाटील व त्यांची टीम बाभुळवाडी येथील तीन छात्र सैनिक मदतीला आले आहेत. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावातील सरपंच किरण पवार, उपसरपंच भागीरथा पिंताबर पाटील, पोलीस पाटील रमेश पाटील व पं. स. सदस्य लक्ष्मण पितांबर पाटिल या ग्रामस्थांनी उपाय योजना केलेलीच आहे त्यात छात्र सैनिकांची भर पडली आहे.हे छात्र सैनिक गावातील, किराणा दुकान, रेशन दुकान इ. ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना सोसिएल डिस्टनसिंगचे पालन करण्याच्या सूचना देतात, गर्दी नियंत्रित करणे नागरिकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती करणे, मास्क लावण्यास सांगणे, सॅनिटाईझर वापरण्यास सांगणे, हाथ स्वच्छ धुण्याचे महत्त्व सांगणे, तसेच गावात विनाकारण घराबाहेर पडणाºया, चौकात बसलेल्या नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करीत आहेत. या कामात गावातील सरपंच किरण पवार उपसरपंच भागीरथाबाई पिंताबर पाटील, पोलीस पाटील रमेश पाटील , सर्व सदस्य व गावातील सर्व ग्रामस्थ छात्र सैनिकांना सहकार्य करीत आहे. बाभुळवाडी गावातील पं.स. सदस्य लक्ष्मण पाटील यांनी छात्र सैनिकांना मास्क वाटप केल तर राज कुमार व सतपाल यांनी सॅनीटायजर वाटप केले.आनंदखेड्यात छात्र सैनिकधमाणे - धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथे एस. एस.व्ही.पी.एस. आर्टस् महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले चार छात्र सैनिक मदतीला आले आहेत. गावात कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी उपाय योजना केलेली आहे. त्यात एन.एन.सी. छात्र सैनिकांची भर पडली आहे.हे छात्र सैनिक गावातील स्टेट बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, किराणा दुकान, रेशन दुकान इत्यादी ठिकाणी येणाºया नागरिकांना सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्याचे सूचना देतात. गर्दी नियंत्रित करणे, नागरिकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती करणे, मास्क लावण्यास सांगणे, सॅनिटाईझर वापरण्यास सांगणे, हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व सांगणे, तसेच गावात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना चौकात बसलेल्या नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करीत आहेत. या कामात सरपंच कविता देवेंद्र भामरे, उपसरपंच मंगा मोरे, पोलीस पाटील तनुजा किरण गवते, देवेंद्र भामरे, ग्रामपंचातयचे सर्व सदस्य व ग्रामस्थ छात्र सैनिकांना सहकार्य करीत आहे.छात्र सेनेची भरीव कामगिरीविंचूर - राष्ट्रीय छात्र सेनाने एकता व शिस्तीचे पालन करित तालुक्यात कोरोनाच्या लढ्यात भरीव कामगिरी करत नागरिकांना सुरक्षेसाठी शिस्त आणण्यासाठी पोलिसांच्या कामात मदतीचा हात दिला आहे. एनसीसी धुळे येथील कॅडेटस ग्रामीण भागात वडजाई, बाबुळवाडी, खेडे, नगाव तसेच देवपूर व धुळे शहर आदी ठिकाणी गावात बाजारपेठ, बँक, रेशन दुकान याठिकाणी कोरोनाबद्दल जनजागृती व लोकांना शिस्त लावण्याचे कार्य केले. यात कॅप्टन के.एम. बोरसे, लेफ्ट. खलाणे, लेफ्ट. एस.ए. पाटील, एन.बी. बच्छाव, एन.व्ही. नागरे, पी.यू. पवार, मिलिंद अहिरे, अल्तमाशखान, हवलदार राजकुमार, हवलदार सतपाल, हवलदार गावडे यांच्या नियंत्रणाखाली कॅडेट्सचे कौतुकास्पद काम सुरू आहे.

टॅग्स :Dhuleधुळे