लोकमत न्यूज नेटवर्कन्याहळोद : भरड धान्य खरेदी सुरू झाली.मात्र बारदान अभावी खरेदी बंद पडली होती. रेशन बारदान देखील नित्कृष्ट निघाल्याने तिढा सुटत नव्हता. अखेर शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर बारदान घेऊन क्रमाने आपला माल आणावा असे आदेश मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त झाल्याने खरेदी वेगाने सुरू झाली आहे.लॉकडाउनमुळे केरळ कलकत्ता बारदान केंद्र बंद पडली. शेतकºयांच्या हितासाठी ज्वारी, मका खरेदी सुरू झाली. परंतु बारदान अभावी मोठी समस्या निर्माण झाली होती. एकीकडे खाजगी व्यापारी मका खरेदी करत असतांना फेडरशनकडे बारदान उपलब्ध होत नव्हते. शेतकºयांनी स्वत: आपला माल बारदानसहित आणला तर खरेदी करण्यात यावा अशी चर्चा पुरवठा विभागात करण्यात आली. तहसीलदार किशोर कदम यांच्या मार्गदर्शनखाली अखेर शेतकरी बारदान घेण्याचे परिपत्रक काढण्यात आले. फेडरशन नियोजन धान्य खरेदी निरीक्षक सुधीर मोहिते व ग्रेडर धनराज पाटील लक्ष ठेऊन आहेत.
बारदानाचा तिढा अखेर सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:58 IST