धुळे : साक्री तालुक्यातील बळसाणे येथे शेतात डुकरांनी पिकांचे नुकसान केल्याच्या कारणावरून दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली. यात शस्त्रास्त्रांचा सर्रास वापर झाला. या घटनेत दोनजण जखमी झाल्याची घटना ८ जानेवारीला सकाळी घडली़ याप्रकरणी निजामपूर पोलीस स्टेशनला दोन्ही गटातील सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात एका गटातील देविदास मधुकर शिंदे (३५, रा़ बळसाणे ता़ साक्री) यांनी फिर्याद दिली़ त्यात म्हटले आहे की, शेतात डुकरे घुसल्याने शेतीचे नुकसान झाले या कारणावरुन शाब्दिक वाद होत, त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात तलवारी, कोयता आणि कुºहाड यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला. संशयित आरोपींनी शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली. या हाणामारीत देविदास शिंदे जखमी झाले़ ही घटना ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बळसाणे गावाच्या बाहेर घडली़ याप्रकरणी शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास निजामपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली़त्यावरून सुरेश भिवसन सोनवणे, विठ्ठल भिवसन सोनवणे, सोमनाथ भिवसन सोनवणे, दादू विठ्ठल सोनवणे, आप्पा विठ्ठल सोनवणे (सर्व रा़ बळसाणे ता़ साक्री) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.तर, दुसऱ्या गटाकडून सुरेश भिवसन सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शेतात डुकरे घुसल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने वाद झाला़ वादाचे पडसाद हाणामारीत झाल्याने भाऊ सोमनाथ सोनवणे यांच्या डोक्यावर कुºहाडीने वार करण्यात आला़ यात त्यांना गंभीर दुखापत झाली़ याप्रकरणी देवा मधु शिंदे (रा़ बळसाणे ता़ साक्री) या संशयित आरोपीच्या विरोधात ११ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला़ घटनांचा तपास सुरु आहे़
बळसाणे येथे दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 21:54 IST