या महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुंबई महिला प्रदेश अध्यक्षा रिजवाना खान यांनी महिलांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. राज्यात महिलांसह इतरही घटकांना स्वावलंबी बनविण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून कौतुकास्पद काम सुरू आहे. तसेच आमदार फारुक शहा यांचे काम उल्लेखनीय असल्याचे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमात कोरोनाकाळात उल्लेखनीय काम करणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार आमदारांच्या हस्ते करण्यात आला. या मेळाव्यात अनेक महिलांनी पक्षप्रवेश केला.
या वेळी जिल्हा अध्यक्षा दीपश्री नाईक, शहर अध्यक्षा फातेमा अन्सारी, मालती चौधरी, ज्योती चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपा नाईक व आभार प्रदर्शन लीना काटे यांनी केले. या वेळी जिल्हाध्यक्ष युसुफ मुल्ला, युवा जिल्हाध्यक्ष शैबाज शाह, शहर अध्यक्ष नुरा ठेकेदार, परवेज शाह, नगरसेवक सईद बेग मिर्झा, नासीर पठाण, गनी डॉलर, आमीर पठाण, पत्रकार साबीर, साजिद साई, रफीक पठाण, नीलेश काटे आदी उपस्थित होते.