कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात असून, ग्रामीण भागातील गैरसमज दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश शासनाने दिले. त्यानुसार गावपातळीवर लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे घेण्यात आली
देवभाने व कापंडणे गावातून कोरोना जनजागृती रॅली, कोरोना जागृती पथनाट्य, पुतळा स्वच्छता, परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, ई. उपक्रमांद्वारे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमात धुळे ४८ महाराष्ट्र बटालियनचे कॅप्टन के. जी. बोरसे, कॅप्टन के. एम. बोरसे, कॅप्टन महेंद्र कुमार वाडे, लेफ्टनंट सुनील पाटील, लेफ्टनंट क्रांती पाटील, फर्स्ट ऑफिसर अनुराधा बोरसे, सुभेदार मेजर गुरमित सिंग, फर्स्ट ऑफिसर बी. एन. पाटील व इतर पी. आय. स्टाफ कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन फर्स्ट ऑफिसर बी. एन. पाटील यांनी केले होते.