दिलीप माळी यांना हा पुरस्कार निवृत्त सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, शासकीय आरोग्य विभाग सहसंचालक एम. डी. देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. माळी हे पंचवीस वर्षापासून सामाजिक कार्य करीत आहेत. आरोग्य क्षेत्र, शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय, पर्यावरण, झाडे लावा झाडे जगवा, दिव्यांग बांधवांचा उपवर-वधू परिचय मेळावा, सामुदायिक विवाह सोहळा, आरोग्य शिबिर अशा कार्यातून समाजसेवा केली आहे. माळी हे सध्या आमदार अमरीशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्या जनकव्हीला येथून असंख्य रुग्णांना रुग्णसेवा देत आहे. सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. मिलिंद कारंजकर, डॉ. रवींद्र महाजन, डॉ. रणजीत काळदाते, प्रवीण महाजन, छायाताई भगत, शशिकांत जाधव, शरद देसले आदी उपस्थित होते.
माळी यांच्या यशाबद्दल आमदार अमरीशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, आमदार काशीराम पावरा, आमदार कुणाल पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अविनाश माळी, जि. प सदस्य वैशाली चौधरी, चेतन चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. अजय सोनवणे आदींनी कौतुक केले .