शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात चित्तरंजन कॉलनीत कार, रिक्षा जळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 12:23 IST

तणावाची होती स्थिती : अग्नीशमन बंबाने विझवली आग

ठळक मुद्देअरिहंत मंगल कार्यालयाजवळील घटनाकार आणि रिक्षा जळाल्याने तणावअग्नीशमन बंबासह पोलीस दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील अरिहंत मंगल कार्यालयाजवळ असलेल्या चित्तरंजन कॉलनी परिसरात रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास रिक्षा आणि कार जळाली़ या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले़ अग्नीशमन बंबाने आग विझविण्यात आली़ शहरातील अरिहंत मंगल कार्यालय आणि संपुर्ण परिसर सध्या धुळे पोलिसांच्या यादीवर अतिसंवेदनशिल म्हणून आहे़ या भागात कोणतीही घटना घडताच सर्वत्र अलर्ट होत असतात़ रविवारी दुपारी या भागात कार आणि रिक्षा जळाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते़ या भागात राहणारे फरीदाबी रशिदशहा यांच्याकडे लग्न सोहळा असल्यामुळे गर्दी होती़ अशातच रविवारी दुपारी १ ते दीड वाजेच्या सुमारास जाबीरशहा शौकत यांची एमएच ४१ ई ३५५२ क्रमांकाची कार आणि जुबेरशहा जाबीरशहा यांची एमएच १५ वाय ३९७१ क्रमांकाची रिक्षा अशी दोनही वाहने जळाली़ अचानक आगीचे लोळ दिसताच लग्न सोहळ्यातील बहुतेकांनी तिकडे धाव घेतली़ कार आणि रिक्षा जळत असल्यामुळे आग विझविण्यासाठी प्रयत्न करत असताना महापालिकेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले़ तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले़ घटनेची माहिती चाळीसगाव रोड पोलिसांना कळताच त्यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली़ यात मात्र या दोनही वाहनांना आग लागली की लावली गेली, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही़ त्यादृष्टीने पोलिसांकडून शोध सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा