धुळे : भारत सरकारच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांतील सरकारी रुग्णालयात डीआरडीओ व हिटर्स यांच्यामार्फत ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे. त्यात धुळे जिल्हा रुग्णालयाची निवड करण्यात आली होती. मात्र १० मे २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या यादीत जिल्हा रुग्णालयाचे नाव वगळण्यात आले होते. खासदार डॉ. सुभाष भामरे यांना ही बाब लक्षात आल्याने त्यांनी डीआरडीओ संस्थेकडे पाठपुरावा करून एक कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.
जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटच्या बांधकामाचे काम युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. तसेच प्लांटसाठी लागणारे विदुतीकरण व ऑक्सिजन पाइपलाइनची व्यवस्था ही रुग्णालयामार्फत करण्यात येईल. ऑक्सिजन प्लांटसाठी जिल्हा रुग्णालयाची निवड झाल्याने जिल्हा रुग्णालयातील अधिष्ठाता व सर्व डॉक्टर्स यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे आभार मानले.