शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

३० मिनिटांत १३ विषयांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:02 IST

मनपा स्थायी सभा : आचारसंहितेपूर्वीची ‘लगीनघाई’; वादग्रस्त विषयालाही मान्यता

धुळे : विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी लगबग वाढली आहे़ बुधवारी दुपारी घेण्यात आलेल्या स्थायी समिती बैठकीत अवघ्या ३० मिनिटांच्या बैठकीत तब्बल १३ विषयांना मंजुरी देण्यात आली़मनपाच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात बुधवारी ३ वाजता स्थायी समितीची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती़ यावेळी आयुक्त अजिज शेख, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, नगरसचिव मनोज वाघ आदींसह विभाग प्रमुख व सदस्य उपस्थित होते़ स्थायीची पहिल्या सभेत एकून १२ विषय सभेत मंजूरीसाठी घेण्यात आले होते़ मनपा बांधकाम विभागाकडून होत असलेल्या विकास कामासाठी १ आॅक्टोबर २०१८ ते ३१ आॅगस्ट २०१९ अखेर झालेल्या विकास कामांची कार्यादेशाची स्थायी समितीसमोर ठेवण्यात आली होती़याविषयांना मिळाली मंजूरीमनपा मालमत्ता कराची थकबाकी खटलाबाबत राष्ट्रीय लोकअदालत आयोजनासाठी ४३ हजार ३० रूपये खर्चाला मंजूरी, प्रभाग १८ मधील रमाई नगर भागातील यशवंत नगर घरकूल सार्वजनिक शौचालयापासून ते उत्कर्ष कॉलनी प्रशांत तिवारी यांच्या घरासमोर नाल्यावर संरक्षण भिंत बांधण्यासाठी निविदा दरार मंजूरी, जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून राष्ट्रवादी भवन ते स्टेशनरोड पर्यत रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी निविदा दर मागविण्यासाठी मंजूरी, जुन्या मनपा इमारतीच्या मागे (खाऊगल्ली) हॉकर्स झोन विकसीक करण्यासाठी मंजूरी, प्रभाग १५ मध्ये वैभव नगर भागात राणा चक्की ते इलेक्ट्रिक डी़पी़ते सैय्यद ते अभय पाटील यांच्या घरापर्यत रस्ता कॉक्रीटीकरण, प्रभाग ८ ग़ नं. २ जे़ बी़ रोड स्वामी नारायण चाळ ते गोल बिल्डींगपर्यत कॉक्रीट गटारीसाठी निविदा दर, प्रभाग १४ मध्ये राजवाडे नगरातील रस्ता कॉक्रीटकरण, प्रभाग १४ रस्ता डांबरीकरण, स्वच्छता देखरेख प्रणाली कार्यान्वीत करण्यासाठी निविदा, तसेच मोराणे गावात पाईप लाईन व व्हॉल टाकण्यासाठी २ लाख ९६ हजार ६५३ कार्यात्तर मंजूरी अशा १२ विषयांना मंजूरी देण्यात आली़प्रभागात फवारणी मागणीप्रभागात डांसाची उत्पत्ती वाढल्याने आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे़ मलेरिया विभागाकडून अद्याप फवारणी करण्यात आले नाही़ एकच अधिकाऱ्यांवर संपूर्ण शहराची जबाबदारी दिल्यास संपूर्ण प्रभागात धुरळणी करण्यासाठी १२ महिने लागेल़ अधिक कर्मचारी नियुक्त करावी अशी करण्यात आली़

टॅग्स :Dhuleधुळे