शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अडीच लाख विद्यार्थ्यांचे अर्ज कायम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 7:47 PM

युवा सेना : सार अ‍ॅपचे दोष, विद्यार्थ्यांना त्रास देता कामा नये

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७ जूनपासून विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरु आहे़ वेगवेगळ्या विषयांसाठी प्रत्येक वेळी सर्व डॉक्युमेंट पुन्हा पुन्हा स्कॅन करुन तब्बल अडीच लाख विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले़ मात्र, त्यात त्रुट्या आढळल्याने ते अर्ज पुन्हा भरण्यात यावे, अशी सूचना विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे़ ही बाब विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणारी असल्याने अडीच लाख विद्यार्थ्यांच्या अर्जामधील त्रुटी काढून कायम करण्यात यावे, अशी मागणी युवा सेनेच्यावतीने करण्यात आली़ उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांना निवेदन देण्यात आले़ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ७ जून पासून रजिस्ट्रेशन सुरु असून २१ जून ही अंतिम मुदत होती़ या मुदतीत अडीच लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली़ एखाद्या विद्यार्थ्याचा अर्ज बाद झाल्यास व त्याने विचारणा केल्यास नियामक प्राधीकरण सीईटी सेलकडे संपर्क साधा, असे सांगतात़ परंतु या सेलचे अधिकारी ‘नॉट रिचेबल’ असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे़ त्यामुळे या अडीच लाख विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसू नये याकरीता २१ जूनपर्यंत भरलेले ४ लाख पैकी अडीच लाख अर्जांतील त्रुटी   काढून कायम करण्यात यावे़ अशी मागणी युवा सेनेचे अ‍ॅड़ पंकज गोरे, संदिप मुळीक, हरिष माळी, जीत पाटील, अमित खंडेलवाल, प्रेम सोनार, भूषण चौधरी, मयूर सोंजे, निलेश चौधरी, धनंजय दीक्षित यांनी केली़पोर्टलवर एकाच वेळेस ५२ कोर्सेसची नोंदणी नसावी़ प्रवेश प्रक्रिया जुन्या संगणक प्रणालीप्रमाणे वापराव्या़ पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची स्कॅनिंग करु नये, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे