शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

भाजपाची कोंडी करायला गेले, पण अनिल गोटे-शिवसेनाच तोंडावर आपटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 13:43 IST

धुळ्यात अनिल गोटेंनी बंडाचा झेंडा फटकावून स्वतंत्र पक्षाची स्थापन केली. गोटेंच्या लोकसंग्राम या पक्षानं अनेक ठिकाणी उमेदवार दिले आहेत.

धुळे- धुळ्यात अनिल गोटेंनी बंडाचा झेंडा फटकावून स्वतंत्र पक्षाची स्थापन केली. गोटेंच्या लोकसंग्राम या पक्षानं अनेक ठिकाणी उमेदवार दिले आहेत. त्यांच्या पक्षाला शिवसेनेनंही पाठिंबा दिला होता. तरीही गोटेंच्या पदरी निराशाच पडली आहे. गोटेंनीही जिकडे उमेदवार दिले नाहीत, तिथे शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता. एकंदरित भाजपाची कोंडी करण्याचा दोन्ही पक्षांचा उद्देश होता. पण जनतेनं अनिल गोटेंचा निभाव लागू दिला नाही. त्यांना जनतेनं सपशेल नाकारून भाजपाच्या पारड्यात भरभरून मतं टाकली आहेत.भाजपानं आतापर्यंत 39 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाची चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यानंतर भाजपा नेत्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनिल गोटेंनी नाटकं केल्यानंच त्यांना यश आलं नाही, अशी टीका धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.  2001मध्ये पत्नी हेमा गोटे या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. गोटे यांचे अलीकडे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी होते. त्यामुळे डॉ. सुभाष भामरेंवर निशाणा साधत गोटेंनी दानवे आणि गिरीश महाजनांवरही टीका केली होती आणि पक्षाला सोडचिठ्टी दिली होती. तीन वेळा धुळे शहराचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करताना त्यांनी प्रस्थापितांविरुद्ध लढाई असेच प्रत्येक निवडणुकीला स्वरूप दिले.यंदा त्यांचे लक्ष्य डॉ. भामरे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल होते. सत्ता राबवित असताना सगळ्यांचे संपूर्ण समाधान करता येत नाही. त्यामुळे असंतुष्ट, असमाधानी लोकांची संख्या मोठी असते. गोटे यांचा जोर याच असंतुष्टांवर होता. प्रस्थापित विरुद्ध निष्ठावंत, गुंडगिरी विरुद्ध कोरी पाटी, भ्रष्टाचारी विरुद्ध प्रामाणिक, बहुजन विरुद्ध अल्पसंख्य असे स्वरूप त्यांनी निवडणुकीला दिले होते. परंतु जनतेनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे.मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार आमदारकीचा राजीनामा दिला नसला तरी लोकसंग्रामच्या माध्यमातून उमेदवार उभे करून बंडाचा झेंडा कायम ठेवला होता. जळगावात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत गिरीश महाजन हे प्रभारी असले तरी आमदार सुरेश भोळे हे निवडणूक प्रमुख होते, हा न्याय धुळ्याला लावण्यात आला नाही. खडसे यांना ‘गुरुबंधू’ संबोधून लढाईला वेगळी दिशा गोटेंनी जाणीवपूर्वक दिली आहे.

टॅग्स :Anil Goteअनिल गोटेDhule Municipal Election 2018धुळे महानगरपालिका निवडणूक