पिंपळनेरात शनिवारी सर्रास सर्व दुकाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:24 PM2020-03-22T12:24:46+5:302020-03-22T12:25:07+5:30

बंदचे आवाहन । तहसीलदार व सहाय्यक पोलिसांनी फिरुन दिल्या सूचना

All shops are open on Saturday in Pimpalnar | पिंपळनेरात शनिवारी सर्रास सर्व दुकाने सुरू

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी शहरी तसेच ग्रामीण भागासाठी आदेश देऊन बंद ठेवण्याचे आव्हान 31 मार्चपर्यंत होऊन देखील पिंपळनेर शहरात शनिवारी सर्रास दुकाने सुरू असल्याचे दिसून आले.
नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊन तसेच ग्रामपंचायतीमार्फत जनजागृती होऊन देखील नागरिक कुठल्याही पद्धतीने शिस्त पाळत नसल्याचे चित्र शनिवारी शहरात दिसून आले. याच पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अपर तहसीलदार विनायक थविल यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना आव्हान केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी नागरिकांना सतर्क करीत दुकाने बंद करण्याचा आदेश यावेळी दिला. यात तर अत्यावश्यक दुकाने सोडून इतर सर्व दुकानेही ३१ मार्चपर्यंत बंद असल्याने नागरिकांनी आपली दुकाने उघडू नये तसेच गदीर्ची ठिकाणे तयार करू नये यासंदर्भाच्या सूचना शहरात फिरून देण्यात आल्या.
यात काही नागरिकांनी स्वत:हून आपली दुकाने बंद करीत प्रशासनाचा आदेश पाळला, तर काही व्यावसायिक नागरिकांनी प्रशासनाकडून आव्हान होऊन देखील इतर व्यवसायिकांची दुकाने उघडलेलीच होती, आज शहरात सर्वत्र हॉटेल, दारूची दुकाने, कोल्ड्रिंक्स पान टपरी, तशाच रस्त्यावर ठेवला मांडून बसणारे व्यवसायिक, कापड व्यापारी, अप्सरा गल्लीतही सर्वच दुकानेही उघडी होती तसेच, मास मच्छी, दारू व्यावसायिकांची दुकाने पुढून बंद तर मागून चालू असल्याचे दिसून आले. कोरोना या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आता शिस्तीची लस टोचण्याची गरज आहे.
मुंबई, पुणे तसेच इतर राज्यातून शहरात येणाऱ्या महिला युवक नागरिकांनी स्वत:हून ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याची गरज वर्तविली जात आहे, यात काही नागरिक स्वत:हून पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी राकेश मोहने यांना भेटून प्रवासी विचारणा करीत आहे आतापर्यंत ६४ प्रवाशांनी भेट दिली आहे.

Web Title: All shops are open on Saturday in Pimpalnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे