After leaving the BJP, many types of 'Kamles' grew in Malhar garden | भाजपा सोडल्यानंतर मल्हार बागेत अनेक प्रकारची ‘कमळे’ फुलली
भाजपा सोडल्यानंतर मल्हार बागेत अनेक प्रकारची ‘कमळे’ फुलली

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मी भाजपा सोडल्यानंतर माझ्या मल्हार बागेत अनेक प्रकारची कमळे फुलली, असे माजी आमदार अनिल गोटे यांनी ‘लोकमत’शी अनौपचारिक चर्चा करतांना सांगितले.
धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांच्याशी शुक्रवारी मल्हार बागेत भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, भाजपा सोडल्यानंतर कोणीच आपल्याशी संपर्क केला नाही. केवळ तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा फोन आला होता की, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला राजीनामा मागे घेण्यास सांगितले आहे. तेव्हा आपण त्यांना मुख्यमंत्र्यांकडे माझा मोबाईल नंबर आहे, असे सांगितल्याचे गोटे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनंतर राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी भेटीला बोलविले होते. तेव्हा  सर्वांनी एकत्र येऊन  ईव्हीएम मशिनसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात आवाहन केले पाहिजे, असे आपण शरद पवार यांना सांगितले.
ईव्हीएम घोटाळयासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की, धुळ्यात ज्या प्रभागात माझ्या घराची स्वत: ची आठ मते असतांना तेथे मला फक्त तीन मते कशी मिळू शकतात. ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात याच्यापेक्षा मोठे उदाहरण काय देऊ शकतो, असेही माजी आमदार गोटे म्हणाले. 
विधानसभा निवडणुकीसंदर्भात अजून ठरविलेले नाही
आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात विचारले असता लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळा बघता विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही, असेही माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले.


Web Title: After leaving the BJP, many types of 'Kamles' grew in Malhar garden
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.