तब्बल २४ तासानंतर वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:35 PM2020-03-20T12:35:13+5:302020-03-20T12:35:44+5:30

अवकाळी पावसाने नुकसान : उर्वरीत भागातील वीज पुरवठा शनिवारपर्यंत सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे

After 2 hours the power supply is smooth | तब्बल २४ तासानंतर वीजपुरवठा सुरळीत

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : अवकाळी झालेला पाऊस व वादळामुळे शहरातील विविध भागातील विजेचे खांब कोलमोडून पडल्यामुळे तब्बल ४४ तासानंतर शहरातील काही भागात विजेचा पुरवठा पुर्ववत सुरू करण्यात आला असून अद्यापही काही भागात वीज नाही़ शनिवारी सकाळपर्यंत शहरातील उर्वरीत सर्व भागातील वीज पुरवठा पुर्ववत सुरू करण्याचे संकेत वितरण कंपनी अधिकाऱ्यांनी दिले.
मंगळवारी झालेल्या वादळामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वीज पुरवठा करणारे इलेक्ट्रीक खांब कोलमोडून तर तारा तुटल्यामुळे वीजेचा पुरवठा खंडीत झाला होता़ तब्बल ४४ तासानंतर करवंद नाका परिसरात विज पुरवठा पुर्ववत सुरू करण्यात आला़ मात्र अद्यापही निमझरी नाका, मेनरोड परिसराचा वीज पुरवठा सुरू झालेला नाही़ शुक्रवारी उर्वरीत काही परिसराचा तर शनिवारी सकाळपर्यंत राहिलेला संपूर्ण शहराचा वीज पुरवठा पुर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले़ शहराला वीज पुरवठा होणारे मुख्य वाहिनीचे खांब कोलमोडून पडल्यामुळे वीज पुरवठा सुरू करण्यासाठी मराविचे अधिकारी व कर्मचाºयांना रात्र-दिवस मेहनत घ्यावी लागत आहे़
वनावल गटासह शिंगावे आदी गावांमध्ये इलेक्ट्रीक खांब कोलमोडून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडीत आहे़ त्यामुळे लवकरच गावठाण फिडर सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे़ त्यानंतर शेतीची वीज पुरवठा पुर्ववत सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले़ शिरपुरातील कॉटर फॅक्टरीचे कापूस व फॅक्टरीतील पत्रा व साहित्य उडून ७० लाखांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस, गारपीठ, वादळी वारामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले़ घटनेच्या दुसºयाच दिवशी लोकप्रतिनिधींसह अधिकाºयांनी नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बांधावर जावून शेतकºयांना धीर दिला़ पीक विमा काढलेले शेतकरी आता बँकेत पावत्या घेण्यासाठी येवू लागले आहेत़ त्यामुळे कोरोनाच्या नावाने बँक बंद करता येणार नाहीत़ त्या पावता घेवून संबंधित पिक विमा कंपनीला ते देखील वेळेत देणे आवश्यक आहे़ तहसिलदारांनी तातडीने बँक अधिकाºयांची बैठक घेवून बँक अधिकाºयांना शेतकºयांना बँकेत न बोलविता त्यांना त्यांच्या गावीच सुविधा मिळण्याची सूचना देखील आमदार काशिराम पावरा यांनी एका बैठकीत मार्गदर्शन करतांना केले़

Web Title: After 2 hours the power supply is smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे