महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शनिवारी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना संर्दभात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकील जिल्हाधिकारी संजय यादव, महापाैर चंद्रकांत सोनार, जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, स्थायी समिती सभापती संजय जाधव, सभागृह नेते राजेंद्र पाटील, उपमहापाैर कल्याणी अंपळकर, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. सुरवातील खासदार डाॅ. सुभाष भामरे यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
जिल्हाधिकारी संजय यादव मार्गदर्शन करतांना म्हणाले की, कोरोना विषाणूची तिव्रता काळानुसार बदलत आहे. पुर्वी ३ ते ४ दिवसात लक्षणे दिवसायची आता अचानक तीव्र लक्षणे दिसून येतात. त्यामुळे सध्या ही लक्षणे जीवघेणे ठरत आहे. मात्र पुर्वी प्रमाणे नागरिक कोरोना गांभीर्याने घेतांना दिसून येत नाही. पुर्वीचे काेरोना बाधित रूग्ण व सध्याचे बाधित रूग्णांमध्ये फरक आहे. त्यामुळे कोरोना विरूध्दचे युध्द आपल्याला लढायची तयारी करायला हवी असे जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले.
प्रास्ताविक करतांना आयुक्त अजिज शेख म्हणाले की, गत काळात आपण कोरोना विरूध्द आपन चांगले काम केले. त्यामुळे कोरोना नियंत्रणात येवू शकला. परंतू सध्या बाधितासोबत मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची बाब चिंताजनक आहे. काेरोना नियंत्र णासाठी मनपा हद्दीत ९ स्वॅब कलेक्शन सेंटर कार्यान्वित केले आहे. तसेच मनपाचे ७ खाजगी रूग्णालयांमध्ये ४ असे एकून ११ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. नागरिकांनी देखील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी असे आवाहन आयुक्त अजिज शेख यांनी केले.