शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

धुळ्यात ४६ वीज चोरांवर कारवाई

By admin | Updated: July 29, 2016 19:22 IST

पिंपळनेर उपविभागातील म्हसदी अंतर्गत धमनार येथील ४६ वीज ग्राहक वीज चोरी करताना आढळून आल्याची घटना शुक्रवारी घडली.

पिंपळनेर : पिंपळनेर उपविभागातील म्हसदी अंतर्गत धमनार येथील ४६ वीज ग्राहक वीज चोरी करताना आढळून आल्याची घटना शुक्रवारी घडली. संबंधित वीज चोरांवर महावितरण कंपनीच्या पथकाने कारवाई केली असून संबंधितांचे वीज मीटर जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पिंपळनेर उपविभागातील म्हसदी अंतर्गत धमनार येथे रोहित्र जळण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले होते. तसेच येथील काही ग्रामस्थ अनधिकृतपणे हिटर व शेगडीचा वापर करत होते. वीज चोरीचे प्रमाणही वाढले होते. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरी प्रतिबंधक मोहीम धमनार गावात राबविण्यात आली. दंडात्मक कारवाई होणार महावितरण कंपनीचे पथक धमनार येथे गेले. तेव्हा ४६ वीज ग्राहक वीज चोरी करताना आढळून आले. त्यांच्या विरोधात वीज नियामक सन २००३ च्या कायद्यानुसार कलम १३५ अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे. संबंधितांना २ लाख ५० हजार दंडात्मक वीज बिल वसूल केले जाणार आहे. या मोहिमेत कार्यकारी अभियंता संजय सगर (ग्रामीण), उपकार्यकारी अभियंता किशोर पाटील, सहायक अभियंता टी. डी. माळी, व्ही. ए. देवरे (छाईल), ए. वाय. रामटेके (सामाडे), कनिष्ठ अभियंता पी. ए. घोलप (पिंपळनेर), डी. एस. पवार, वाय. एस. खैरनार यांनी गावात घराची पाहणी केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. धिंगाणा घालणाऱ्या ३ जणांवर गुन्हा दाखलवीज चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी येथील घरांमधून हिटर, शेगडी, मीटर जप्त केले. वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांचे वीज मीटर जप्त करण्याची कारवाई सुरू असताना गावातील रवींद्र अभिमन मोरे, बन्सीलाल नारायण धनगर, सुभाष गंगाधर बच्छाव यांनी पथकातील कर्मचाऱ्यांशी धिंगाणा घातला. तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच पथकाने जप्त केलेले १४ मीटर त्यांच्या गाडीतून हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार योगेश आनंदा खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तीन जणांवर कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ प्रमाणे व तसेच भारतीय विद्युत कायदा १३८, १३९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.