शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

धुळे जिल्ह्यात दहा महिन्यात ३११ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 15:39 IST

गौण खनिज विभागाची ५१ टक्के वसुली : अवैध वाळू उपसा करणाºयांवर १ कोटींची दंडात्मक कारवाई

ठळक मुद्देएप्रिल २०१७ ते मार्च २०१८ याकालावधित गौण खनिज विभागाला वसुलीसाठी ३६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. जानेवारी अखेरपर्यंत १८ कोटी ६० लाख ४७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. आतापर्यंत ५१.६८ टक्के वसुली झाली असून मार्च अखेर पर्यंत गौण खनिज विभागाला प्राप्त असलेले उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. गेल्यावर्षी गौण खनिज विभागाला ३३ कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी या विभागाने गेल्यावर्षभरात २५ कोटी ७५ लाख ९१ हजार वसुली करण्यात या विभागाला यश मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्याच्या कालावधीत अवैध वाळू व गौण खनिज उपसा करणाºया ३११ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांकडून १ कोटी ४० लाख ८० हजार १३९   रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, गौण खनिज विभागाने यावर्षी प्राप्त उद्दिष्टापैकी जानेवारी अखेरपर्यंत ५१ टक्के वसुली केल्याची माहिती समोर आली आहे. अवैध गौण खनिज किंवा वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा तालुकानिहाय पथकांची नियुक्ती केली होती. परंतु, या पथकांचा वाळू माफियांवर ‘वचक’च निर्माण होत नसल्याने जिल्ह्यात सर्रास वाळू व इतर गौण खनिज उपसा क रण्याचे प्रकार सुरू आहे. विशेषत: या पथकांनी कारवाई करूनही हे प्रकार थांबत नसल्याची बाब आता समोर आली आहे. प्रांताधिका-यांनी पकडली सर्वाधिक वाहनेवाळू माफियांना चाप बसावा; याउद्देशाने तहसीलदार व प्रांताधिकाºयांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या पथकातील सदस्यांना मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यात एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१८ या कालावधित सर्वाधिक १८५ वाहने ही प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी पकडली. तर शिरपूरच्या प्रांताधिकारी नितीन गावंडे यांनी १२६ वाहने पकडली.  धुळे अपर तहसील कार्यालयांतर्गत ५३, धुळे ग्रामीण ६९, साक्री ४६, पिंपळनेर १७, शिरपूर ६३, शिंदखेडा ४५, दोंडाईचा अपर तहसील कार्यालय १८ अशा प्रकारे पथकांनी कारवाई केली असून संबंधित वाहनचालकांकडून दंडात्मक वसुली केली आहे. आतापर्यंत १९ पैकी ३ वाळू घाटांचा लिलाव जिल्ह्यात यंदा विभागीय आयुक्त कार्यालयाने १९ वाळू घाटांची अपसेट प्राईज निश्चित करून दिली होती. त्यात साक्री तालुक्यातील पांझरा नदीवरुन दातर्ती १, दातर्ती २, शिंदखेडा तालुक्यात तापी नदीवर कमखेडा , आच्छी १, आच्छी २, हिसपूर १,  हिसपूर २ , टाकरखेडा, शिरपूर तालुक्यातील साहूर, जापोरा, उप्परपिंड १, उप्परपिंड २, पाथर्डे, खर्दे खुर्द, सावळदे, कुरखळी-१, कुरखळी २, वाठोडे, तºहाडी या वाळू घाटांचा समावेश होता. परंतु, या वाळू घाटांपैकी शिंदखेडा तालुक्यातील आच्छी २ व शिरपूर तालुक्यातील उप्परपिंड १ व २  या वाळू घाटांचा लिलाव झाला. उर्वरीत वाळू घाटांचा लिलाव अद्याप झालेला नाही.