अपघातामुळे ‘अर्ध्यावरती डाव मोडला़ अधुरी एक कहानी़’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 10:20 PM2019-08-19T22:20:19+5:302019-08-19T22:20:44+5:30

गावापासुन अवघ्या एक किलोमिटर अंतरावर काळाची झडप

Accidental 'one half story left half-story full' | अपघातामुळे ‘अर्ध्यावरती डाव मोडला़ अधुरी एक कहानी़’

अपघातामुळे ‘अर्ध्यावरती डाव मोडला़ अधुरी एक कहानी़’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
निमगुळ :  शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ येथील मनीषा बागल(३२) व पती महेश बागल (३५) हे बहिणीच्या सासºयांचा  दशक्रिया विधी आटोपून गावाकडे परतत असताना.अवघ्या  एक किलोमीटर अंतरावर गाव बाकी राहिले असताना. झालेल्या भीषण अपघातात मनीषा बागल यांच्या वर काळाने झडप घातली. त्यांच्या संसाराचे क्षणार्धात  होत्याचे न व्हते झाले.
पती महेश बागल याना देखील गंभीर दुखापत झाली असून हाताला फ्रॅक्चर व कंबरेला मुका मार बसला आहे. ते थोडक्यात बचावले असले तरी संसाराची अर्धांगिनी दगावल्याने त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली आहे.मनीषा बागल यांच्या सासरची घरची परिस्थिती तशी बेताची कोरडवाहु दोन बिघे जमीन. सासरे दोन्ही पायांनी अपंग या परिस्थितीत मनीषा बागल या पती महेश बागल यांना संसारात शेतीच्या कामात सक्रिय साथ देत होत्या.मनीषा बागल या  आय.टी.आय. झालेल्या पती महेश याचं शिक्षण तस कमी मात्र आपल्या घरच्या मंडळींना आपल्या शिक्षणाचा कधीच कमी पणा त्यांनी  जाणवू दिला नाही.शिक्षण असून ही घरातील शेतीत रमल्या मात्र नियतीला हे पाहवले नाही. मोठा मुलगा शुभम वय ९ वर्ष तर लहान मुलगा यश ७ वर्ष दोन्ही मुले चांगले शिकून मोठे व्हावे. यासाठी घरची  बेताची परिस्थिती असून ही मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवण्याची धडपड आज स्वप्नवत सोडून मनीषा यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने आज गावातील अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत.या दोन्ही लहान मुलांची आई मनीषा गावाला जाऊन येते म्हणून सांगून गेली आणि आता त्या कधीच परत येणार या चिमुकल्यांचा प्रश्नाचं उत्तर कुणाचं कडे नाही. मनीषा यांचे भाऊ मनोहर सैदाणे हे धडगाव येथे कृषी खात्यात नोकरीस आहेत. भावांची बहिणीला वेळोवेळी मदत होती. आज माहेरी देखील दु:खाचा कोलाहल आहे. मनीषा बागल यांच्या अकाली जाण्याने गावावर शोककळा पसरली असून त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावातील सर्व लहान मोठे उद्योग बंद ठेवण्यात आले होते. शोकाकुल वातावरनात दुपारी ४ वाजेला त्यांच्यावर मोठ्या जनसमुदायात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Accidental 'one half story left half-story full'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे