शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सरवड फाट्यावर अपघात, ३ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 18:46 IST

ट्रक-दुचाकीची धडक : नंदाणे, बुरझडसह लोणपिंप्रीत हळहळ

ठळक मुद्देधुळे तालुक्यातील सरवड फाट्याजवळील घटनाट्रक आणि दुचाकी अपघातात १ जागेवर तर २ रुग्णालयात झाले मृत

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे/सोनगीर : तालुक्यातील सरवड फाट्याजवळ सोनगीरकडून धुळ्याकडे जाणाºया ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली़ यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी घडली़ यात एकाचा जागीच तर दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला़ अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती़ या अपघातात सुनील नानाभाऊ पाटील (२८, रा़ नंदाणे ता़ धुळे), हेमंत रामेश्वर पाटील (१८, रा़ बुरझड ता़ धुळे) आणि भुरा जगन निकम (२९, रा़ लोणपिंप्री ता़ चाळीसगाव जि़ जळगाव) असे या मृत झालेल्या तिघांची नावे आहेत़ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सरवड गावाच्या फाट्याजवळील गतिरोधकाजवळ सोनगीरकडून धुळ्याकडे येणारा ट्रक आणि दुचाकी यांच्यात  दुपारी दोन वाजेच्या सुमारास अपघात झाला़ या अपघातात दुचाकीवरील तिघे फेकले गेले़ त्यात त्यांना जबर दुखापत झाली़ दुचाकीवर बसलेल्या तिघांपैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झालेला होता़ त्याच्यासह अन्य दोघा जखमींना तातडीने गंभीर अवस्थेत सोनगीर टोल प्लाझाच्या  रुग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले़ जखमींपैकी भुरा जगन निकम याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तेथे त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला़ या अपघातात तिघेही ठार झाले आहेत़ ठार झालेल्या पैकी सुनील पाटील हे विवाहित असून हेमंत पाटील आणि भुरा निकम हे अविवाहित आहेत़ अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलिसांनी घटनास्थळ गाठले़ वाहतूक सुरळीत करत असताना अपघातग्रस्त ट्रक आणि दुचाकी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे़ गुन्हा नोंदविण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात