मिनीडोअर चालकाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:40 PM2017-08-21T17:40:05+5:302017-08-21T17:40:22+5:30

अजंगजवळील घटना : तालुका पोलिसात नोंद

accident minidor one death | मिनीडोअर चालकाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

मिनीडोअर चालकाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

Next
ठळक मुद्देधुळे तालुक्यातील अजंग गावाजवळ घडली घटनामयत गणेश चौधरी हा मिनीडोअर चालक होता या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळे तालुक्यातील अजंग गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मिनीडोअर चालकाचा मृत्यू ओढवल्याची घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली़ अपघाताची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली़ 
नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील धुळे तालुक्यातील अजंग गावाजवळ अपघाताची ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली़ गणेश दशरथ चौधरी (४८) रा़ मच्छिबाजार चौक, पालाबाजार धुळे असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे़ धुळे तालुक्यातील अजंग गावाजवळ रविवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास गणेश चौधरी याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली़ या अपघातात गणेश यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ उपचार सुरु असताना गणेश चौधरी यांची प्राणज्योत मालवली़ 
याप्रकरणी विजय रामचंद्र काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे़ पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत़ या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे़ 

Web Title: accident minidor one death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.