शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 22:12 IST

सांगवी। उभ्या कंटेनरवर बस आदळली, इंदूर येथील ५५ भाविक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : भरधाव वेगातील लक्झरी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवरला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात इंदूर येथील ५५ भाविक जखमी झाले़ त्यापैकी १३ जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे़ उर्वरीत जखमींना इंदौर येथे हलविण्यात आले़इंदौर येथील एकाच कॉलनीतील भाविक शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतांना मुंंबई-आग्रा महामार्गावरील सांगवी गावाजवळ शनिवारी दुपारी साडेतीनला हा अपघात झाला़इंदूर येथील अन्नपूर्णा मंदिर परिसरातील जयजगत कॉलनी व केशव नगरातील भाविक एम़पी़०९-एफए-९९७९ क्रमांकाच्या खाजगी लक्झरी बसने शिर्डी येथे दर्शनासाठी शनिवारी सकाळी निघाले होते़ सांगवी गावाजवळ रस्त्याच्या बाजूला कंटनेर क्रमांक एम़पी़३३-एच-१३२६ हा उभा होता़ त्यावेळी लक्झरी बस चालक अपसर खान अमर खान (५०) रा़ देवास याच्या शेजारी बसलेल्या एका इसमास डुलकी लागल्यामुळे तो इसम चालकाच्या अंगावर पडला़ बस भरधाव वेगात असल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस कंटेनरवर जावून आदळली़ त्यामुळे लक्झरी बसच्या पुढील भागाचा चक्काचूर होवून गाडीतील सर्वच प्रवाशी जखमी झाले़घटनेचे वृत्त कळताच सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पथकासह जखमींना मिळेल त्या वाहनाने शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी रवाना केले़ याकामी जि़ प़ सदस्य योगेश बादल, तरूण शर्मा, भास्कर धोबी आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले़या अपघातात विक्की लुलचंद केशवाणी (४६), पूजा विक्की केशवाणी (४५), विकास गुरूदास हासवाणी (२९), नंदलाल राजदेव (३६), आशा नोमाणी (६०), धरमपाल नंदराम उधाणी (३५), चिराग दीपक उधाणी (४), दीपक घनश्याम उधाणी (३४), जयपाल दासवाणी (२५), घोलक कटारीया (५०), करीना कटारीया (१५), मंजू शर्मा (५०), हनी रामदेव (३०), रीना हनी रामदेव (३०), सतिष तलरेजा (५९), कोमल तलरेजा (५२), आशिया वावजा (३०), दीपा उधाणी (३९), हिरालाल सचदेव (४२), अशोक नारायणदास (५६), कोमल वधवा (५४), गीता कटारीया (५०), सिया उधाणी (२२), रोनशी लुधवाणी (३३), कोहिनूर लुधवाणी (१०), दिपीका मोटवाणी (२३), भारती राजकुमार मोटवाणी (४७), नयन अडवाी (१७), अशोककुमार बदलाणी (५२), राजेश जगवाणी (५२), महेश हरीयानी (५९), विशाल बहराणी (३०) सर्व राहणार इंदौर हे प्रवाशी जखमी झालेत़ सांगवी पोलिसांसह नगरसेवक चंदनसिंग राजपूत, मयूर राजपूत, कल्पेश राजपूत, गजू राजपूत, राकेश सनेर, किशोर चव्हाण, राजकुमार हासवाणी, विनोद जगलाणी, राजेश चांदवाणी, अशोक डेबराणी यांच्यासह गावातील तरुण आणि पत्रकारांनी मदत कार्य केले़

टॅग्स :Dhuleधुळे