शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

ब्रेक निकामी झालेला ट्रेलर बनला मृत्युदूत; ११ वाहनांना धडक, तीन विद्यार्थ्यांसह १० ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 06:39 IST

मृतांमध्ये तीन विद्यार्थी व दोन महिलांसह ट्रेलरचालक, सहचालकाचा समावेश आहे.

-सुनील साळुंके शिरपूर (जि. धुळे) : समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच पळासनेर गावाजवळ १६ चाकी ट्रेलरचा भीषण अपघात झाला. खडी वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्याने,  ११ वाहनांना धडक दिली तसेच बसस्थानकाला धडकत ट्रेलर एका हाॅटेलवर जाऊन आदळला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून, २३ जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये तीन विद्यार्थी व दोन महिलांसह ट्रेलरचालक, सहचालकाचा समावेश आहे. हा अपघात मुंबई- आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर झाला. इंदूरकडून  शिरपूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरमध्ये ४० टनापेक्षा जास्त खडी भरली होती. पळासनेर गावाजवळील हरियाणा हॉटेलसमोर एक ट्रकचालक टायर बदलत असताना त्यास  ट्रेलरने धडक देऊन एका दुचाकी गाडीला उडविले. त्यानंतर एका कारला जबर धडक दिली. त्यापाठोपाठ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकी, स्कूल बस आदी वाहनांना धडक देत बसस्थानक व हॉटेल तुडवत कंटेनर उलटला. कंटेनरमधील असलेली १६ टनांपेक्षा अधिक खडी रस्त्यावर व बसस्थानकाबाहेर उभ्या असलेल्या शाळकरी, लोकांच्या अंगावर पडल्यामुळे ते काही क्षणांतच खडीत दबले गेले. 

पाच लाखांची मदत अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त करीत मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

मृतांची नावेप्रतापसिंग भीमसिंग गिरासे (७०, रा. पळासनेर), गीता मुरी पावरा (१५, कोळशापाणी पाडा मोयदा-पळासनेर), मुरी सुरसिंग पावरा (२८, रा. कोळशापाणी), संजय जायमल पावरा (३८, रा. कोळशापाणी), रितेश संजय पावरा (१४, रा. कोळशापाणी), किरमा डेबरा कनोजे (१२, रा. आंबापाणी), सुनीता राजेश खंडेलवाल (५०, रा. देवपूर धुळे), कंटेनरचालक कन्हैयालाल बंजारा (५५, रा. जावदा, जि. भिलवाडा, चित्तोडगड), सहचालक सुरपालसिंग जवानसिंग राजपूत (५२, रा. जावदा, ता. निंबाहेडा), दशरथ पावरा (३५, रा. पळासनेर) 

टॅग्स :AccidentअपघातDhuleधुळे