शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

धुळे जिल्ह्यातील २९ हजार विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:15 IST

२७ डिसेंबरपासून चाचणीला सुरूवात, चाचणीसाठी संगणक, मोबाईलचा वापर

आॅनलाइन लोकमतधुळे : दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्राची सर्वाधिक आवड आहे, याविषयीचा विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोबाईलद्वारे कल चाचणी घेण्यात येत आहे. एका महिन्यात धुळे जिल्ह्यात ४६७ नोंदणीकृत शाळांमधील २९ हजार १५० पैकी २९ हजार ४३ विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिली. त्याची टक्केवारी ९९.६३ एवढी असल्याची माहिती कल चाचणीच्या जिल्हा समन्वयक जयश्री पाटील यांनी दिली आहे.भविष्यातील करिअरच्या वाटा निवडताना तसेच शिक्षणासाठी कोणते क्षेत्र निवडावे यासाठी महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह श्यामची आई फाउंडेशन व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागामार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे.दहावीनंतर कुठले क्षेत्र निवडायचे, याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. त्यासाठी ही कल चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या कलमापन चाचणीमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळण्यास तसेच त्यांची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, हे कळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.चाचणी घेण्यास मुदतवाढजिल्ह्यात २७ डिसेंबर २०१९ पासून कलमापन चाचणी घेण्याचा उपक्रम सुरू झालेला आहे. त्यासाठी मोबाईल अ‍ॅपचा तसेच संगणकाचा वापर करण्यात येत आहे. ही चाचणी १८ जानेवारी २०२०पर्यंत घेण्याचे आदेश होते. मात्र आता कलचाचणी घेण्यास मुदतवाढ मिळालेली असून, ३१ जानेवारीपर्यंत ही चाचणी घेतली जाणार आहे.जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास २९ हजार १५० एवढी आहे. २८ जानेवारी अखेरपर्यंत २९ हजार ४३ विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिलेली आहे.जिल्ह्यात कल चाचणीचे प्रमाण ९९.६३ टक्के एवढे असल्याचे सांगण्यात आले. यात धुळे ग्रामीणमध्ये ६ हजार ४७३, धुळे शहरात ६ हजार ६३४,साक्री तालुक्यातील ६ हजार २५४, शिंदखेडा तालुक्यातील ४ हजार ६३०, शिरपूर तालुक्यातील ५ हजार ५२ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कल चाचणी दिलेली आहे.यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील, तसेच कलचाचणीच्या जिल्हा समन्वयक तथा डायटच्या वरिष्ठ अधिव्याख्याता जयश्री पाटील, समुपदेशक डी.बी.पाटील यांचे सहकार्य लाभत आहेत.

 

टॅग्स :Dhuleधुळे