कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी तृप्ती घोडमिसे, शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता जयप्रकाश पाटील, गोंदूरच्या सरपंच सविता किशोर भदाणे, ग्रा.पं. सदस्य शरद भदाणे, रामकृष्ण नेरकर, कैलास पाटील आदी उपस्थित होते. गोंदूर ग्रामपंचायतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून आई-वडील हे पहिले गुरू आणि त्यानंतर शिक्षकच हे खरे गुरु असतात. तेच आपल्याला दिशा व संस्कार देण्याचे काम करतात. अशा गावातील ९० शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गावात सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आल्याने शिक्षकांनी आयोजकांचे कौतुक केले.
प्रांताधिकारी तृप्ती घोडमिसे म्हणाल्या की, मी सुध्दा शिक्षकाची मुलगी असून मलाही शिक्षकांबद्दल आदर आहे. अशा प्रकारचा सर्व शिक्षकांचा सत्कार करण्याचा पहिला कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान मिळाला. त्याबदल गावाचे आभार मानले व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक रामकृष्ण नेरकर यांनी केले. सूत्रसंचालन किशोर भामरे तर आभार माजी उपसरपंच किशोर भदाणे यांनी मानले .कार्यक्रमासाठी ग्रामसेवक सुधीर भामरे, तलाठी सदाशिव सूर्यवंशी, आधार माळी, अमर पाटील, सागर पाटील, राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले.