शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

धुळे जिल्ह्यातील १२५९ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 13:31 IST

आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश: यावर्षी शाळा व जागांमध्ये वाढ

आॅनलाइन लोकमतधुळे : आरटीई अंतर्गत वंचीत व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. त्यानुसार आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया १३ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील १०३ शाळांमध्ये १ हजार २५९ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून देण्यात आली.जिल्ह्यात २०१३-१४ पासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया १३ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. आॅनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ फेब्रुवारीपर्यंत असल्याची माहिती आरटीईच्या वेबसाईटवर दिलेली आहे.त्यानंतर मार्च-एप्रिल महिन्यात लॉटरी पद्धतीने मेरीट काढण्यात येईल. पालकांना प्रवेश नोंदणी करतांना एक किलोमीटर, तीन किलोमीटर, व त्यापेक्षा अधिक अंतरातील केवळ १० शाळा निवडता येतील. परंतु प्रवेश एकाच शाळेत मिळणार आहे. आॅनलाईन नोंदणी करतांना पालकांनी उत्पन्नाच्या दाखल्यामधील बारकोड अर्जात नमूद करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याला आॅनलाईन प्रवेश मिळाल्यानंतर तसा एसएमएस शाळा व पालकांना पाठविण्यात येणारआहे. सबळ कारणाशिवाय कोणत्याही शाळेला प्रवेश नाकारता येणार नाही. प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल असा इशारा शिक्षण विभागाने दिलेला आहे.१०३ शाळांमध्ये प्रवेशजिल्ह्यातील १०३ शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश मोफत देण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी १०१३ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला होता. यावेळी १२५९ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.यावर्षी शाळांची व जागांचीसंख्या वाढलीआरटीई प्रवेश अंतर्गत यावर्षी सहा शाळांची नव्याने भर पडलेली असून २२ जागा वाढल्या आहेत.गेल्यावर्षी फक्त ९७ शाळा होत्या. तर यावर्षी १०३ शाळांमध्ये हे प्रवेश दिले जातील. दरम्यान शहरातील नामांकित शाळांमध्येच आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांची धडपड सुरू आहे.

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण