शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात ८ हजार सिंचन विहिरींचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 17:41 IST

बागायती क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार

ठळक मुद्देआर्थिक वर्ष २०१७-१८ पर्यंत सिंचन विहीरींच्या प्रस्तावांना मंजुरी, कार्यादेश देण्याचे अधिकार हे गटविकास अधिकारी स्तरावर होते. मात्र विहीरींना मंजुरी देणे तसेच कार्यादेश काढताना पंचायत समिती स्तरावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार वाढत असल्यामुळे आता मंजुरीचे अधिकार हे जिल्हा परिषद स्तरावर म्हणजेच जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिका-यांकडून देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे : समृद्ध महाराषट्र जनकल्याण योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहिरींचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०१६-१७ आणि २०१७-२०१८ या दोन वर्षात दहा हजार ८०५ सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. यापैकी ८ हजार १८ विहिरींचे कार्यादेश दिल्यामुळे कामे सुरू झाली आहेत. दरम्यान, आतापर्यंत २ हजार ८२ विहिरी मार्गी लागलेल्या आहेत. सिंचन विहिरींमुळे जिल्ह्यात सिंचनाच्या क्षेत्रात वाढ होण्याबरोबरच बागायती क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत आर्थिक वर्ष २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांसाठी विहीरींचे लक्षांक देण्यात आले होते. त्यात धुळे जिल्ह्यासाठी सात हजार ८६६ विहीरींचे उद्दीष्ट देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र दहा हजार ८०५ विहीरींना मंजुरी देण्यात आली आहे. सुरुवातीला असलेल्या उद्दिष्टाच्या  तुलनेत साक्री तालुक्यासाठी एक हजार आणि शिंदखेडा तालुक्यासाठी दोन हजार अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करण्यात आले होते. मंजूर केलेल्या विहिरींपैकी ८ हजार १८ विहिरींची प्रत्यक्षात कामे सुरू करण्यात आली.त्यात धुळे तालुका २ हजार ८११, साक्री तालुका २ हजार ३२०, शिंदखेडा तालुका १ हजार ९९९, शिरपूर तालुका ८८८ विहिरी मंजूर करºयात आल्या आहे. आतापर्यंत २ हजार ८२ विहिरींचे काम पूर्ण झालेली आहेत. त्यात सर्वाधिक ९८८ विहिरी शिंदखेडा तालुक्यात पूर्ण झालेल्या आहेत. तर सद्य:स्थितीत आठ हजार १८ विहीरींची कामे प्रगतीपथावर आहेत. शेतकºयांना सिंचन विहीरींमुळे जीवनमान सुधारावे तसेच गावातल्या मजुरांना गावातच रोजगार मिळावा अशा दुहेरी हेतूने या विहीरींना मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान,  सलग दोन वर्षाचे उद्दिष्ट एकाच वेळेस देण्यात आल्यामुळे चालू आर्थिक वर्षात  विहीरींचे वाढीव उद्दिष्ट आलेले नाही. तसेच नवीन विहीरींच्या कामांना मंजुरीदेखील देण्यात आली नाही. 

टॅग्स :Dhuleधुळेzpजिल्हा परिषद