शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना ५० टक्के आरक्षण देणार; राहुल गांधी यांची महिला न्याय हक्क परिषदेत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 06:09 IST

कोणताही सर्व्हे करणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आरक्षण देण्याची घोषणा केली. पण, सर्व्हे केल्यानंतर दहा वर्षांनी महिलांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मात्र, काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास कुठलाही सर्व्हे न करता महिलांना ५० टक्के आरक्षण देईल, अशी घोषणा काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी महिला परिषदेत केली. यावेळी त्यांनी महिलांना न्याय देण्यासाठी पाच महत्त्वपूर्ण घोषणा करीत आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजविला.

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी धुळ्यात आली. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला न्याय हक्क परिषद पार पडली. सुरत बायपासवरील मैदानावर झालेल्या या परिषदेस राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, चंद्रकात हंडोरे, खासदार रजनी पाटील आदी उपस्थित होते. १९ मिनिटांच्या भाषणात राहुल गांधी यांनी देशातील शेतकरी, मजूर वर्ग, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्यावर कशाप्रकारे अन्याय होत असल्याचे सांगितले. 

पंचसूत्रीत नेमके काय?

- महालक्ष्मी - देशातील प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यात दरवर्षी १ लाख रुपये जमा करण्यात येतील.- आधी आबादी, पूरा हक - सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात येईल.- शक्ती का सन्मान - अंगणवाडी, आशा आणि माध्यान्ह भोजन योजनेतील महिला कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन दुप्पट करण्यात येईल.- अधिकार मैत्री - महिलांना त्यांच्या हक्कांबाबत आणि कायदेशीर खटल्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल.- सावित्रीबाई फुले वसतिगृह - प्रत्येक जिल्हा मुख्यालयी केंद्र सरकारच्या वतीने नोकरदार महिलांसाठी वसतिगृहाची उभारणी करण्यात येईल. तसेच देशातील इतर वसतिगृहांची संख्याही दुप्पट केली जाईल. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा