शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

८ लाख बालकांना मिळणार गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 14:25 IST

राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य : दोन टप्प्यात असणार नियोजन

आॅनलाइन लोकमतधुळे : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त ८ आॅगस्ट २०१९ रोजी धुळे जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ८ लाख १९ हजार ३७६ बालकांना जंत नाशकाची गोळी देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार देशात ६८ टक्के बालकांमध्ये आढळून येणारा आतड्यांचा कृमी दोष हा मातीतून प्रसारीत होणाऱ्या जंतूमुळे होतो. २८ टक्के बालकांना कृमी दोष होण्याची शक्यता असते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव होय. या कृमी दोषांचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहज होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालिन कृमी दोष हा व्यापक स्वरुपाचा असून मुलांना कमकुवत करतो. कृमी दोषामुळे रक्ताक्षय व कुपोषणाबरोबरच मुलांची बौध्दिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे एक कारण आहे. देशात ६ ते ५९ महिन्यांच्या वयोगटात प्रत्येकी १० बालकांमागे ७ बालकांमध्ये रक्ताक्षय आढळतो. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असू शकते. तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्ताक्षय आढळतो.देशात ५ वषार्खालील सुमारे ५० टक्के बालकांची वाढ खुंटलेली आहे आणि साधारणत: ४३ टक्के बालके कमी वजनाची आहेत. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा उद्देश १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व पूर्व शालेय वयोगटातील बालके व शालेय वयोगटातील विद्यार्थी यांना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. तालुकास्तरावर मोहिमेंतर्गत शाळेतील नोडल शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्याधिकारी यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षक व इतर आरोग्य कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले आहे. ८ आॅगस्ट रोजी जेवणानंतर शाळा, अंगणवाडी केंद्रांत जंतनाशक गोळी देण्यात येईल. ज्यांना पहिल्या टप्प्यात गोळी दिली जाणार नाही, त्यांना १६ आॅगस्ट रोजी मॉप- अप दिनी गोळी देण्यात येईल. बालकांना या गोळीचा लाभ द्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गंगाथरण डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे