शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सायबर सेलमार्फत ४५ गुन्ह्याची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 19:23 IST

पोलीस प्रशासन : खून, दरोडा, जबरी चोरीच्या तपासासाठी उपयुक्त

ठळक मुद्देकोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याच्या स्वरुपानुसार सायबर सेल या स्वतंत्र पण महत्वपूर्ण विभागाची मदत घेतली जाते़ त्याचवेळेस मदतीचे स्वरुप मात्र पूर्णपणे गोपनीय ठेवले जाते़ गुन्ह्याची उकल करत असताना सर्व प्रकारची माहिती आॅनलाईन पध्दतीने संकलित केली जाते़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या अधिपत्याखाली या विभागाचे काम सुरु आहे़ 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पोलीस प्रशासनाच्या तपास कामासाठी सायबर सेल हा विभाग अत्यंत उपयुक्त असून गेल्या तीन महिन्यात ४५ पेक्षा अधिक गुन्ह्याची उकल या विभागाच्या मदतीने करण्यात आली आहे़ त्यात खूनासह दरोडा, जबरी चोरीसह मोबाईल चोरी आणि आॅनलाईन फसवणुकीच्या घटनांचा समावेश आहे़ आरोपींना जेरबंदही करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली़ इंटरनेट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे़ दैनंदिन जीवनातले बरेच व्यवहार याच इंटरनेटच्या माध्यमातून पार पाडले जातात़ पण, अपुºया माहितीच्या आधारावर त्यांचा वापर धोकादायक देखील ठरला आहे़ सायबर गुन्हेगार याच उणीवांचा फायदा उठवून इतरांचे सामाजिक आणि आर्थिक नुकसान करतात़ परिणामी इंटरनेटचा वापर सुरक्षितरित्या करणे ही काळाची गरज ठरत आहे़ सायबर गुन्ह्यांमध्ये हॅकिंग, नोकरीचे आमिष दाखवून होणारी फसवणूक, विवाह विषयक फसवणूक, वैयक्तिक ओळखीतून चोरी, बँक विषयक फसवणूक, एटीएमसंबंधी फसवणूक, समाज माध्यमांद्वारे होणारे गुन्हे आणि आॅनलाईन खरेदी करताना होणारी फसवणूक यासारख्या काही बाबी आहेत की त्याचा सायबर गुन्हेगारीमध्ये संबंध येतो़ याशिवाय खून, दरोडा, जबरी चोरी यासारख्या विविध प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर पोलिसांच्या तपास कामात सायबर सेल या विभागाची महत्वपूर्ण भूमिका असते़ 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस