शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

प्रयोग शाळेत ३०० नमुने तपासले जातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:31 IST

मृृदुला द्रविड : १०० नमुण्याची क्षमता

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बाधितांची तपासणी स्थानिक जिल्हात होण्यासाठी शासनाने यंदा राज्यात पहिली लॅब भाऊसाहेब हिरे रूग्णालयात उपलब्ध करून दिली आहे़ या प्रयोगशाळेत दररोज ३०० नमुन्यांची तपासणी केली जाते़ तर यापूर्वी ९० ते १०० नमुने तपासले जात होते़ अशी माहिती हिरे वैद्यकीय प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ.मृदुला द्रविड यांनी लोकमतशी बोलतांना दिली़प्रश्न - हिरे वैद्यकीय प्रयोगशाळेत किती कर्मचारी कार्यरतउत्तर : प्रयोगशाळेत १५ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच सुक्ष्मजीवशास्र व एचआयव्ही विभागातील तंत्रज्ञांची देखील मदत होत असते. निजंर्तुक वातावरणात स्वॅब तपासावे लागतात. स्वॅब तपासतांना विषाणू मधून आरएनए वेगळा काढला जातो नंतर त्याच्या वेग वेगवेगळ्या कॉपीज तयार करण्यात येतात. या प्रक्रियेत तंत्रज्ञ व कर्मचारी महत्त्वाची भूमिका निभावतात.प्रश्न - किती नमुने तपासण्याची प्रयोगशाळेची क्षमता आहे ?उत्तर : आधी एका दिवसात १०० नमुन्यांची तपासणी केली जात होती. मात्र आता मनुष्यबळ वाढविले आहे तसेच तपासणीच्या तुकड्यांमध्ये वाढ केली आहे. यामुळे सध्या एका दिवसांत ३०० नमुन्यांची तपासणी केली जात आहे.प्रश्न - रिपोर्ट प्राप्त होण्यासाठी किती कालावाधी लागतो?उत्तर : एका तुकडीत ४५ नमुने तपासण्यात येतात. दोन प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. कोरोनाची शक्यता असणारे नमुने वेगळे काढले जातात. रिपोर्ट निगेटीव्ह असेल तर आठ तासांत समजते. रिपोर्ट जर पॉझिटिव्ह असेल तर त्याची पुन्हा तपासणी करून पुष्ठी करण्यात येते. यात दोन तास अधिक वेळ लागतो.प्रश्न- इतर जिल्ह्यातील तपासण्यासाठी येणाऱ्या नमुयांचे कसे नियोजन असते?उत्तर : जे नमुने आधी येतात त्यांची तपासणी लगतच्या तुकडीत केली जाते. तसेच अत्यवस्थ व मृत्यू झालेल्या रूग्णांना प्राधान्य दिले जाते.तपासणीसाठी जाणाºया स्वॅबच्या प्रत्येक तुकडीत अशा रूग्णांसाठी तीन किंवा चार जागा राखीव ठेवलेल्या असतात.प्रश्न - नमुने तपासतांना वैद्यकीय कर्मचारी कशी दक्षता घेतात ?उत्तर : नमुने तपासतांना सुरक्षेची पुर्ण खबरदारी घेतली जाते. कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट परिधान केलेले आसतात. त्यामुळे नाक, कान, डोळे पुर्णपणे झाकले जातात.असा असतो प्रयोगशाळेतील दिनक्रमसकाळी ९ वाजता प्रयोगशाळेत पोहचते. तोपर्यंत रात्री दाखल झालेल्या रूग्णांचे स्वॅब घेण्यात येतात. दिवसभरात विविध तुकड्यांमध्ये नमुने तपासले जातात. कामात व्यस्त असल्यामुळे दिवस कसा जातो तेदेखील कळत नाही. रात्री ११ वाजेपर्यंत नमुन्यांची तपासणी सुरू असते. नमुने जास्त असले तर आणखी उशीर होतो.स्वॅब घेण्याची प्रक्रिया कशी असते?कोणाचे स्वॅब घ्यायला पाहिजे यासाठी शासनाने काही नियम घालून दिले आहेत. परदेश प्रवास झाला असेल किंवा पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेला असल्यास त्या व्यक्तीचे स्वॅब घेतले जावे असे निकष आहेत. प्रवासाचा इतिहास असलेल्या वा पॉझिट्व्हि रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे स्वॅब घेण्यात येतात. तसेच कोरोनाचे लक्षणे असणाºया रूग्णांचे स्वॅब घेतले जातात. हिरे रूग्णालयात सकाळी ७ ते ९ या वेळे दरम्यान स्वॅब घेण्यात येतात. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येते. तसेच जळगाव , नाशिक , मालेगाव, नंदुरबार जिल्ह्यातील तपासणीला येतात.

टॅग्स :Dhuleधुळे