मेळाव्याच्या सुरुवातीला बालब्रह्मचारी सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ पंच विठोबा बारसे होते. प्रमुख अतिथी म्हणून गणपत बीडकर (पुणे), लक्ष्मण खताडे (नगर), नगरसेवक भगवान गवळी, भागवत नागापुरे, लक्ष्मण खंदरकर, विठ्ठल उन्हाळे, नंदुरबार येथील संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे, जिल्हाध्यक्ष गोपाल लगडे, अशोक यादबोले, राजेंद्र लगडे, चाळीसगाव येथील नगरसेविका संगीता लगडे, सुभाष निस्ताने, सुपाजी पीरनाईक, अण्णाप्पा चिपडे, जळगाव जिल्हाध्यक्ष कृष्णा गठरी, रवींद्र परळकर, प्रकाश लंगोटे आदी उपस्थित होते. यावेळी शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य धाकलूआप्पा औशिकर आणि धुळे तालुक्यातील बळाणे ग्रामपंचायत सदस्य देवा आंजीखाणे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भीमराज घुगरे यांनी केले. सूत्रसंचालन राजू पंगुडवाले यांनी केले. आभार ज्येष्ठ सल्लागार किसन जोमीवाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल जोमीवाळे, किशोर झारखंडे, नाना अंजीखाणे यांनी परिश्रम घेतले.
३ विवाह जुळले
मेळाव्यात ३ विवाह जुळले. आणखी विवाह जुळण्याचा विश्वास संघटनेचे अध्यक्ष भीमराज घुगरे यांनी व्यक्त केला. संघटनेच्या वतीने दुसऱ्यांदा अशा स्वरूपाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.