शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

कळमसरे फाट्याजवळ अ‍ॅपेरिक्षा-कंटनेर अपघातात ३ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 18:03 IST

शिरपूर : सूतगिरणीतील मजूरांना घेवून जात असतांना घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : मुंबई आग्रा महामार्गावरील कळमसरे फाट्यासमोर सूतगिरणीतील मजूरांना घेवून जाणारा अ‍ॅपेरिक्षा चालक विरूध्द दिशेने रस्ता ओलांडत असतांना इंदूरकडून येणाºया एका कंटनेरने धडक दिल्यामुळे अ‍ॅपेरिक्षातील १ महिला मजूर जागीच ठार झाली तर चालकासह अन्य ७ मजूर गंभीररित्या जखमी झालेत़ दरम्यान, धुळे येथे उपचार घेत असतांना २ जणांचा मृत्यु झाला़ एकूण या अपघातात ३ जणांचा मृत्यु झाला़१८ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कळमसरे फाट्यासमोरील गोल्ड फॅक्टरीसमोर हा अपघात झाला़  शहरातील काही मजूर सूतगिरणीला कामाला आहेत, त्याची ड्युटीवरील बस सुटल्यामुळे ते खाजगी अ‍ॅपेरिक्षा क्रमांक एम़एच़१८-डब्ल्यु-५७०८ ने ७ मजूर सूतगिरणीकडे जायला निघालेत़ अ‍ॅपेरिक्षा चालक उड्डान पूलाचा रस्ता ओलांडून विरूध्द दिशेकडे जाण्यासाठी महामार्ग रस्ता ओलांडत असतांना इंदूरकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणारा कंटेनर क्रमांक एम़एच़४६-एफ-७२२८ ने धडक दिल्यामुळे अ‍ॅपेरिक्षाने २-३ पलटी खाल्ली़  त्यात कल्पनाबाई दगा कोळी (वय ४१, रा.भरतसिंग नगर, शिरपूर) ही महिला जागीच ठार झाली तर लक्ष्मीबाई रमेश मराठे (३५), प्रमिलाबाई तुकाराम मराठे (६०), ज्योती दगा कोळी (२०), नरेंद्र दगा मराठे (२५), कविता दगडू अहिरे (३०), सुदामसिंग पदमसिंग राजपूत (६०) सर्व रा.शिरपूर, सुभाष शिलदार पावरा (३६) रा.नेवाली हे जखमी झालेत. अपघाताने झालेल्या आवाजामुळे परिसरातील लोक धावून गेलेत़ त्यांनीच जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढल्यानंतर महामार्ग रूग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले़ डॉ.कल्पेश वाघ, विनोद निकम, भगवान बोरसे आदींनी जखमींवर उपचार केलेत. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले़दरम्यान, धुळे येथे नेत असतांना रस्त्यावरच लक्ष्मीबाई रमेश मराठे (३५) व प्रमिलाबाई तुकाराम मराठे (६०) दोन्ही राहणार भरतसिंग नगर शिरपूर या दोघे महिलांचा मृत्यु झाला़अपघाताची माहिती मिळताच शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत हे पोलिस कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झालेत. अपघातानंतर कंटेनर चालक स्वत:हून पोलिसात हजर झाला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. आईचा मृत्यु़़़ मुलगी गंभीरया अपघातात कल्पनाबाई दगा कोळी या विधवा महिलेचा मृत्यु झाला असून तिच्या सोबत मुलगी ज्योती दगा कोळी ही देखील सोबत कामाला जात होती़ ती देखील या अपघातात गंभीर दुखापती झाली आहे़ कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यामुळे ते सूतगिरणीत कामाला जात होते़ मयताला एक लहान मुलगा आहे़अखेर गतीरोधक काढले़़़सावळदे ते पळासनेर गावादरम्यान अनेक ठिकाणी यापूर्वी महामार्गावर अपघात होवू नये म्हणून गतीरोधक टाकण्यात आले होते़ त्यामुळे या मार्गावर मोठ्या संख्येने गतीरोधकांची संख्या वाढली होती़ मात्र गत महिन्यात या महामार्गावरील सारेच गतीरोधक काढून टाकल्यामुळे तेव्हापासून अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसते़

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात