शिरपूर : शिरपूर-चोपडा मार्गावरील अजनाड गावाजवळ कार व दुचाकी याच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. दोन्ही वाहनांची जोरदार टक्कर झाल्याने मोटारसायकलीचा चक्काचूर झाला आहे. मोठा आवाज झाल्याने मदतीसाठी नागरिक धावून आले.गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शिरपूर ते चोपडा मार्गावरील अजनाड शिवारातील पेट्रोलपपंच्या जवळ हा अपघात झाला. मोटारसायकल (एम. एच. १९ सी. एम. ९३५०) व चारचाकी कार क्रमांक एम. एच. १९ सी. यू. ५४१३ या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील चालक रोहिदास तुरमल भिल, वय ३५, मुलगी सुनीता रोहिदास भिल वय २० आणि मुलगा साई रोहिदास भिल वय ९ वर्षे सर्व रा. उजळोद, ता. शहादा, जि. नंदुरबार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी थाळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस आल्यानंतर वाहने हटविण्यात आली आणि वाहतूक सुरळीत झाली.
कार - मोटारसायकल अपघातात ३ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 22:50 IST