शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

लॉकडाऊन काळात २७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:44 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : मदतीच्या निकषात पाच प्रस्ताव पात्र, १० अपात्र तर १२ प्रलंबित

धुळे : कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात २७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ त्यापैकी अर्थसहायासाठी केवळ पाच प्रस्ताव पात्र ठरले असून दहा प्रस्ताव अपात्र ठरले आहेत़ उर्वरीत १२ प्रस्ताव प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली़कोरोनाच्या काळात मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण २७ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची प्रशाकीय आकडेवारी आहे़मार्च महिन्यात सहा आत्महत्या झाल्या असून त्यापैकी अर्थसहायासाठी दोन प्रस्ताव पात्र ठरले आहेत़ तीन प्रस्ताव अपात्र तर एक प्रस्ताव फेरचौकशीसाठी प्रलंबित आहे़एप्रिल महिन्यात एक आत्महत्या झाली असून सदर आत्महत्येचा प्रस्ताव अर्थसहायासाठी अपात्र ठरला आहे़मे महिन्यात सहा आत्महत्यांपैकी दोन पात्र तर चार प्रस्ताव अपात्र ठरले आहेत़ मे महिन्यात झालेल्या आत्महत्यांपैकी एकही प्रस्ताव प्रलंबित नाही़जून महिन्यात सात शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत़ त्यापैकी मदतीसाठी केवळ एकच प्रस्ताव पात्र ठरला असून चार प्रस्ताव अपात्र तर दोन प्रस्ताव प्रलंबित आहेत़जुलै महिन्यात ७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत़ त्यांच्या कुटूंबियांनी मदतीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत़ हे सर्व प्रस्ताव चौकशीसाठी प्रलंबित आहेत़तत्पूर्वी शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहाय्यता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात १४ जुलै रोजी झाली होती़ या बैठकीत एकूण सात प्रस्ताव पात्र ठरले होते़ तर पाच प्रस्तावांची फेरचौकशी करण्याचा निर्णय घेतला होता़संबंधित तहसीलदारांनी चौकशी करुन सदरचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले होते. या बैठकीत एकूण २३ प्रस्ताव मांडण्यात आले होते. त्यापैकी सात प्रस्ताव मंजूर झाले. ११ प्रस्ताव अपात्र ठरले. पाच प्रस्ताव फेरचौकशीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. धुळे ग्रामीणमधील २, शिंदखेडा तालुक्यातील ४, दोंडाईचा अपर तहसिल कार्यालयाच्या अखत्यारितील एका प्रस्तावाचा समावेश आहे़समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजय यादव होते. यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, शिरपूर पंचायत समितीचे सभापती सत्तारसिंग पावरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, धुळे ग्रामीणचे तहसीलदार किशोर कदम, शिंदखेड्याचे तहसिलदार साहेबराव सोनवणे, शिरपूरचे तहसिलदार आबा महाजन, साक्रीचे तहसिलदार प्रवीण चव्हाणके, दोंडाईचाचे अपर तहसीलदार सुदाम महाजन, धुळे शहराचे तहसिलदार संजय शिंदे , पिंपळनेरचे अपर तहसिलदार विनायक थवील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीतील काही प्रस्तावांची फेरचौकशी सुरू आहे़कुटूंबियांना मिळते एक लाखाची मदतशेतकºयाची आत्महत्या मदतीच्या निकषात बसली तर त्याच्या कुटूंबियांना एक लाखाची आर्थिक मदत शासनातर्फे केली जाते़ त्यासाठी शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहायत समितीपुढे प्रस्ताव ठेवले जातात़ चौकशीअंती प्रस्तावांना मंजूरी देण्याचे अधिकार या समितीला असतात़ या समितीमध्ये प्रशासकीय अधिकाºयांसह लोकप्रतिनिधींचा देखील समावेश असतो़

टॅग्स :Dhuleधुळे