थाळनेर :- शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी पहाटे ५ वाजेच्या सुमारास केलेल्या नाकाबंदीत गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला़ पोलिसांनी ट्रकसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला़ अंधाराचा फायदा घेवून ट्रकचालकाने पळ काढला़
थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी आपल्या पथकासह शिरपूर चोपडा रस्त्यावरील सावेर फाट्याजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास नाकाबंदी केली़ त्यावेळी आरजे १४ जीजे ३२७८ या ट्रकवर संशय आल्याने ट्रकला पोलिसांनी थांबवले. पोलिसांना पाहून ट्रक चालक आणि सहचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला़ परिणामी पोलिसांना संशय अधिकच बळावला़ ट्रकची तपासणी केली असत ट्रकच्या मागच्या बाजूस ११ लाख ५ हजार रुपये किंमतीचे ३६ गुरे ही आखूड दोरीने दाटीवाटीने बांधलेली आढळून आली़ तर १० लाख किंमतीचा ट्रक असा एकुण २१ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्यासह पोलीस कर्मचारी विजय जाधव, सिराज खाटीक, आळंदे आदींनी केली आहे.
Web Title: 21 lakh worth of goods seized along with cattle trucks
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.