मंगळवारच्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालय धुळे येथील ४७ अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला. श्रीकृपा कॉलनी येथील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १७ अहवालांपैकी एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील १२ अहवालांपैकी १ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लोहगाव येथील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. भाडणेत एक अहवाल पॉझिटिव्ह आला. साक्री येथील ओम शांती नगरात एक रुग्ण आढळला आहे. तसेच रॅपिड अँटिजन टेस्टचे ७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात देवपूर येथील एकाचा समावेश आहे. एसीपीएम महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतील २ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात उडानेचा १, तर धुळे शहरातील एकाचा समावेश आहे.
१७ अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST