धुळे : मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांवर मोठया प्रमाणात ठिक-ठिकाणी खड्डे पडले होते़ त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती़ अखेर महापालिकेला शहरताील रस्ते दुरूस्तीसाठी ३४ लाखांची निविदा काढली आहे़शहरातील खड्यांची डागडुजी करण्यासाठी मनपातर्फे तब्बल ३४ लाखांचा निधी देण्यात येणार आहे़ त्याबाबत निविदा प्रसिध्द करून कामासाठी वर्कआॅडर काढली जाणार आहे़ शहरातील देवपूर भाग वगळता शहरातील अन्य खड्डे बुजविण्यासाठी २५ लाख रुपये तर देवपूर येथील भुमिगत गटारीच्या कामासाठी ९ लाख रुपये देण्यात येणार आहे. देवपूर भागात मुख्य रस्त्यावर आवश्यक त्याठिकाणी मुरुम टाकून रस्ते दुरूस्त केले जाणार आहे़ त्यामुळे नागरिकांचे वाहतूकीचा प्रश्न सुटणार आहे़अनेक दिवस दुर्लक्षशहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. खड्ड्यांमुळे नागरीकांच्या जिवीताला धोका निर्माण होऊ पाहत आहे़ मालेगाव रोडवर गणपती पॅलेस परिसरातील खड्ड्यात पडून एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता़ तर अन्य रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात झाले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मनपा दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी स्व:ता सिमेंट क्राँक्रीट तर काहींनी मुरूमने खड्डे बुजले आहे.वाहतूकीसाठी अडचणीचीदेवपूर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ लहान मोठे प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत़ वाहनधारकांना त्या रस्त्यावरुन जाताना त्रास सहन करावा लागतो़ बऱ्याचवेळा या ठिकांणी अपघात देखील झाले आहेत़ वाहनाचेही नुकसान होत असते़ या ठिकाणाहून दररोज शेकडो वाहनांचा वावर असल्याने तत्काळ हा रस्ता दुरूस्त करण्याची गरज आहे़काजवे पुलाचे काम अर्धवटअक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग पांझरा नदीत सोडण्यात आल्याने नदीला महापूर आला होता़ त्यामुळे काजवे पुलाचे दुरावस्था झाली होती़ त्यामुळे हा पुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता़ त्यानंतर पुलाचे कठडे बसविण्यात आले आहे़ मात्र पुलाचा रस्ता डांबरीकरण न करता हा पुल वाहतूकीसाठी सुरू केला आहे़ त्यामुळे बºयाच दिवसापासून पुलाचे काम अर्धवट पडल्याने रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही़ त्यामुळे नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे़पारोळा रोड धोकेदायकपारोळा रोडवर बºयाच ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहेत. काही खड्डे एक मीटरचे, तर काही खड्डे दीड-दोन मीटर लांबच लांब आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ गेल्या दीड वर्षापूर्वी खड्डा पडला आहे.
रस्ता दुरुस्तीसाठी ३४ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:26 IST