धुळे जिल्ह्यातील दहिवेल, रोहोड सबस्टेशन अंतर्गत १०० के.व्ही.चे ट्रान्सफार्मर बसवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:09 PM2020-02-25T12:09:53+5:302020-02-25T12:11:34+5:30

युवक कॉँग्रेसची मंत्री के.सी.पाडवी यांच्याकडे मागणी

1 KV transformer should be installed under Dahivel, Rohod substation in Dhule district. | धुळे जिल्ह्यातील दहिवेल, रोहोड सबस्टेशन अंतर्गत १०० के.व्ही.चे ट्रान्सफार्मर बसवावेत

धुळे जिल्ह्यातील दहिवेल, रोहोड सबस्टेशन अंतर्गत १०० के.व्ही.चे ट्रान्सफार्मर बसवावेत

googlenewsNext

आॅनलाइन लोकमत
पिंपळनेर :दहिवेल, रोहोड सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांना १०० के.व्ही. ट्रांसफार्मर बसविण्यात यावे अशी मागणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी यांना निवेदन देऊन मागणी केली.
दहिवेल व रोहोड या दोन्ही सब स्टेशन अंतर्गत येणाºया गावांना ६३ के.व्ही.व २५ के.व्ही असे ट्रान्सफार्मर आहेत. यामुळे गावात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी १०० के.व्ही.चे ट्रान्सफार्मर या दोन्ही सबस्टेशनअंतर्गत बसवावे अशी मागणी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रमेश सूर्यवंशी, गणेश गावित, पंकज सूर्यवंशी, उदय सूर्यवंशी यांनी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मुंबईत हे निवेदन देण्यात आले.
दहिवेल सब स्टेशन अंतर्गत मंदाने दापुर, चिंचपाडा, चिंचपाडा, बोधगाव, तर रोहोड सबस्टेशन अंतर्गत रोहोड पैकी हारआंबापाडा, लहान गरताड, चोपाळे, डालीपाडा, लव्हारदोडी, राईनपाडा, हनुमंतपाडा, मोठीकुहेर, डवण्यापाडा, तळंग्याचापाडा, शेंगल माळ, काकरपड्या पैकी खळटीपाडा आदी गावांना शंभर केव्ही ट्रांसफार्मर बसविण्यात यावी यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर मंत्री पाडवी यांनी लवकरच वरील गावांना १०० के.व्ही. ट्रान्सफार्मर बसविण्यात येतील असे आश्वासन दिले.

Web Title: 1 KV transformer should be installed under Dahivel, Rohod substation in Dhule district.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे