माेदी सरकारविराेधात जाेरदार घाेषणाबाजी
उस्मानाबाद - इंधनासाेबतच गॅसचे दरही दिवसागणिक वाढू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. काेराेनामुळे अर्थकारण काेलमडलेल्या जनतेला जास्तीच्या संकटात लाेटण्याचे काम केद्रातील माेदी सरकार करीत असल्याचा आराेप करून जिल्हा युवक काॅंग्रेसच्या वतीने मंगळवारी पेट्राेल पंपावर निदर्शने केली. हे आंदाेलन युवकचे उपाध्यक्ष राेहित पडवळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
फेब्रुवारी महिन्यात जवळपास तीनवेळा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली. तीही अनुक्रमे २५ रूपये, ५० रूपये आणि २५ रूपये एवढी आहे. मार्च महिना उजाडताच आणखी २५ रुपयांनी वाढ झाली. गॅस सिलिंडरचा आजचा दर ८२७ एवढा झाला आहे. सततच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य लाेकांचे अर्थकारण काेलमडून पडले आहे. एवढेच नाही तर पेट्राेल, डिझेलच्या दरातही सातत्याने वाढ हाेत आहे. याचा थेट परिणाम दैनंदिन तसेच अन्य वस्तुंच्या दरावर हाेऊ लागला आहे. असे असतानाही केंद्रातील माेदी सरकार यावर काहीच बाेलायला तयार नाही, असा आराेप करीत येथील पेट्राेल पंपावर निदर्शने कली. तसेच सरकारविराेधी प्रचंड घाेषणाबाजीही करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सूचनेनुसार उपाध्यक्ष राेहित पडवळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदाेलन झाले. यावेळी तुळजापूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मकरंद डोंगरे, बिभीषण हजारे, विलास कोरेकर, विजयसिंह घोगरे, विशाल हजारे, संजय कोरेकर,दिनेश डोंगरे, राजपाल पडवळ, प्रविण पडवळ, इंद्रजीत हजारे, प्रमोद बचाटे, सुभाष पाचपुंडे आदी उपस्थित हाेते.