डाळी सप्टेंबर २०२० मार्च२०२० मे २०२१
तूरडाळ ९० ८८ ९६
हरभरा डाळ ६४ ६० ७०
तांदूळ ५० ५२ ५३
साखर ३३ ३३ ३३
गूळ ३० ३० ३०
बसेन ७० ७० ७५
शेंगदाणा तेल १०० १२० १८०
सूर्यफूल तेल ९५ १२० १६५
करडी तेल १३० १५० १८०
सोयाबीन तेल ८५ १०० १५०
पामतेल ८० ११० १४०
डिझेल दराचा भाव
जानेवारी २०२० ६०
जून २०२० ६५
जानेवारी २०२१ ७९
मे २०२१ ८९
प्रतिक्रिया
गॅस सिलिंडरचे दर वाढले असून, आता खाद्यतेलाच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे आता दोन किलोऐवजी एक किलो तेल खरेदी करावे लागत आहे. भाज्यांना कमी तेलाची फोडणी द्यावी लागत आहे.
जयश्री चौगुले, गृहिणी
कोरोना काळात सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. त्यातच आता गॅससिलिंडरसह किराणा, खाद्यतेलाचे दरात वाढ झाली आहे. वाढता महागाईमुळे घर कसे चालवावे असा प्रश्न पडला आहे. शासनाने महागाईवर नियंत्रण ठेवावे.
संगीता गजधने, गृहिणी
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पामतेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत असल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे किराणा साहित्य व खाद्यतेलाच्या दारात वाढ होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. सध्या दुकाने बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
संजय मंत्री, अध्यक्ष, उस्मानाबाद व्यापारी महासंघ