शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

‘राेहयाे’ कक्षाची कासवगती; सिंचन विहिरींच्या हजारावर प्रस्तावांवर साचली धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 16:55 IST

शेतकऱ्याची गरज ओळखून वैयक्तिक लाभाच्या याेजनेत सिंचन विहिरींचाही समावेश करण्यात आला.

ठळक मुद्देकाही संचिका २०१८ पासून मंजुरीच्या प्रतीक्षेत

उस्मानाबाद : सिंचनाची कायमस्वरूपी सुविधा निर्माण व्हावी, यासाठी राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरी घेण्यास मंजुरी देण्यात आली. एक-दाेन वर्षांआड पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचाही या याेजनेकडे कल वाढला आहे; परंतु ‘राेहयाे’ कक्षाच्या कासवगतीमुळे सुमारे १ हजारापेक्षा अधिक प्रस्तावांवर धूळ साचली आहे. यातील काही प्रस्ताव तर तब्बल २०१८ पासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.

राेजगार हमी याेजनेतून वैयक्तिक लाभाच्या याेजनाही देण्यात येतात. शेतकऱ्याची गरज ओळखून वैयक्तिक लाभाच्या याेजनेत सिंचन विहिरींचाही समावेश करण्यात आला. शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद लाभ आहे. प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव येत आहेत; परंतु वेळेवर मंजुरी मिळत नसल्याने अपेक्षेवर पाणी फेरले जात आहे. जिल्हा परिषद राेहयाे कक्षाकडे २०१८ पासून आलेले प्रस्ताव प्रलंबित आहेत. प्रस्तावांना मंजुरी मिळावी, यासाठी संबंधित शेतकरी कधी पंचायत समिती तर कधी राेहयाे कक्षाला खेटे मारीत आहेत; परंतु येथील अधिकारी, कर्मचारी सुरुवातीला पाच अपूर्ण कामे पुढे करून त्यांना आल्या पावली परत पाठवीत हाेते. यानंतर २८ ऑगस्ट २०२० मध्ये शासनाने ही अट रद्द करून त्या-त्या गावच्या लाेकसंख्येनुसार विहिरींना मंजुरी देण्यात यावी, असे सुधारित आदेश काढले. त्यामुळे प्रस्ताव तातडीने मार्गी लागतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा हाेती; परंतु तसे झाले नाही. मध्यंतरीच्या काळात काेराेना आला. या संकटाचा दाखला देत पुन्हा संचिकांवरील धुळीचे थर साचले. काेराेनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागली. त्यामुळे पुन्हा प्रक्रिया ठप्प झाली. परिणामी, आजघडीला जिल्हा परिषद राेहयाे कक्षाकडे सुमारे एक हजारापेक्षा अधिक प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. प्रस्तावांना मंजुरी देण्याची गती अशीच राहिल्यास शेतकरी सिंचन विहिरी कधी खाेदणार, असा प्रश्न उपस्थित हाेऊ लागला आहे.

साडेतीनशे प्रस्ताव ‘स्वाक्षरी’साठी...शेतकऱ्यांतून नाराजीचे सूर उमटू लागल्यानंतर राेहयाे कक्षाने सुमारे साडेतीनशे प्रस्ताव तयार केले आहेत. स्वाक्षरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. त्यांची स्वाक्षरी हाेताच विहिरींची कामे हाती घेण्याचा मार्ग माेकळा हाेणार आहे. त्यामुळे सीईओ कधी स्वाक्षरी करतात? याकडे प्रस्तावधारक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

एकट्या परंड्याच्या ७०० प्रस्ताव...एकट्या परंडा तालुक्यातील थाेडेथाेडके नव्हे तर सातशे प्रस्ताव जिल्हा परिषद राेहयाे कक्षाकडे दाखल झाले आहेत. यातील बहुतांश प्रस्ताव ५ अपूर्ण कामांच्या अटीमुळे लटकले हाेते; परंतु ही अटच रद्द झाल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. असे असतानाही यातील एकाही प्रस्तावाला आजवर मंजुरी मिळालेली नाही. ५० प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अशी आहे प्रक्रिया...ग्रापंकडून विहिरीचे प्रस्ताव पंसकडे दाखल केले जातात. तेथे महाग्रारोहयो कक्षात त्याची छाननी होते. यानंतर पंसमध्ये सहायक गट विकास अधिकारी, वरिष्ठ लिपिक, विस्तार अधिकारी असा प्रवास करत संचिका महाग्रारोहयो कक्षात परत येते. यानंतर तांत्रिक मान्यतेसाठी लघु पाटबंधारे उपविभागाकडे पाठवली जाते. याच दरम्यान भूजल सर्वेक्षण विभागाची वारीही घडते. हा सर्व सोपस्कार पार पाडत गटविकास अधिकारी यांच्या दालनात काही दिवस मुक्काम करत ही संचिका जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी (महाग्रारोहयो) कक्षात दाखल होते. याठिकाणी पुन्हा अटी व निकषांच्या कचाट्यातून तपासणी होत पुढे प्रशासकीय मान्यतेसाठी विहिरीच्या संचिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाकडे प्रवास सुरू होतो. तेथे प्रशासकीय मान्यता देण्यात येते. ती मिळाल्यानंतर प्रमाचे आदेश परत याच टप्प्याने तालुकास्तरावर पंसकडे पोहोचतात.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र